प्रमोद धुरंधर नॅशनल एज्युकेटर अवॉर्ड ने सन्मानित
सर्वच स्तरावरून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
राष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेच्या माध्यमातुन अनन्य साधारण कार्य करणाऱ्या पुरुष,महिला, व संस्था, पत्रकार लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांना तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती रेडियंट टॅलेन्ट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे त्यांच्या योगदान यासाठी सन्मानित केल्या जाते. यावर्षीचा हा पुरस्कार अमरावतीचे जनाई ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद धुरंधर यांना प्रदान कऱण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुसरस्काराने प्रमोद सरांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन केल्या जात आहे.
जनाई ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद धुरंधर यांनी संस्थेच्या माध्यमातून मागील 16वर्षा पासून विविध प्रशिक्षण देत आहेत यामध्ये पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण बँक रेल्वे स्टाफ सेलेक्शन एलआयसी भरती पूर्व प्रशिक्षण IBPS भरती पूर्व प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल रेडियंट टॅलेन्ट बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली व त्यांच्या यथोचित सन्मान कऱण्यात आला.
प्रमोद धुरंधर यांनी आतापर्यंत एकूण 1650 प्रशिक्षण दिले असून 2000 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे तसेच करोना काळात अत्यावश्यक तसेच गरजूंना किराणा वाटप याची दखल घेऊन rediant बुक ऑफ रेकॉर्ड यांनी प्रमोद धुरंधर यांना नॅशनल एज्युकेटर अवॉर्ड 2024 हा सन्मान आचार्य अत्रे सभागृह पुणे येथे शहीद भगतसिंह यांचे पुतणे, तसेच तानाजी मालुसरे यांचे वंशज गुरुतेज सिंग ब्रार शकील पटेल यांचे हस्थे 29 सप्टेंबर 2024 ला संपन्न झाला
–
आता आपल्या मोबाईलवरच नियमित वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक राज्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी
https ://epaper .vidarbhaprajasattak.com