अमरावतीला IT – Park स्थापन करणार – उद्योगमंत्री उदय सामंत
किरण पातुरकर यांच्या संघर्षाला यश
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
मागील एक वर्षापासून अमरावती शहरामध्ये आय. टी. पार्क ची स्थापना व्हावी यासाठी किरण पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये एका कृती समितीची स्थापना करण्यात आली. या कृती समिती तर्फे वर्षभरापासून कार्यक्रम, उपक्रम व आंदोलन राबविण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
२७ सप्टेंबर ला अमरावतीला महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमासाठी मा. उद्योगमंत्री उदय सामंत अमरावतीला आलेले असतांना पुन्हा एकदा Mission IT पार्क @ अमरावती कृती समिती तर्फे किरण पातुरकर आणि टीमने उद्योगमंत्र्यांना निवेदन देवून अमरावतीला IT पार्क ची किती गरज आहे याची चर्चा केली आणि आजच्या या कार्यक्रमातच IT पार्क ची घोषणा करवी असा आग्रह किरण पातुरकरांनी धरला.
उद्योगमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सभेला संबोधित करीत असतांना अमरावतीला IT पार्क देण्याची घोषणा केली आणि त्या दृष्टीक ने तनू तातडीने हालचाली कराव्यात असे निर्देश एम.आय.डी.सी. चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई तसेच मुख्य अभियंता नागपूर आणि विभागीय अधिकारी अमरावती यांना दिले.
उद्योगमंत्र्यांनी अमरावतीला IT पार्क देण्याची घोषणा केल्यावर उपस्थित जनतेने टाळ्यांचा कडकडाट करून घोषणेचे स्वागत केले. मेगा टेक्सटाईल पार्क, शासकीय मेडिकल कॉलेज च्या आंदोलनाच्या यशानंतर किरण पातुरकरांच्या IT पार्क @ अमरावती या मागणीला ही यश प्राप्त झाले. पुन्हा एकदा अमरावती मध्ये किरण पातुरकरांच्या व्हिजन चे कौतुक होत असून किरण पातुरकरांसारख्या नेतृत्वाची अमरावती शहराला गरज आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.
————————————————–
आता आपल्या मोबाईलवरच नियमित वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक राज्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी
https ://epaper .vidarbhaprajasattak.com
https ://epaper .vidarbhaprajasattak.com