भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले;
म्हणाले, “मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही
जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू असून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. रविवारी, जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान मल्लिकार्जुन खरगे अचानक बेशुद्ध पडले. भाषण करत असताना त्यांची प्रकृती खालावल्याने काही वेळासाठी त्यांना भाषण थांबवावे लागले. काही मिनिटांनी त्यांनी भाषण पुन्हा सुरू केले, परंतु नंतर थोड्या वेळाने भाषण संपवावे लागले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी यानंतर भाषणाच्या शेवटी आपल्या वयाचा उल्लेख करून सांगितले की ते अजून मरणार नसून, ते नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवल्याशिवाय मरणार नाहीत. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर टीका करत, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने भारतातील तरुणांसाठी काहीही केले नसल्याचा आरोप केला. तसेच, भाजप नेत्यांनी देशातील समृद्धी परत आणली की नाही, हे विचारण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
खरगे जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करत असून, या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयासाठी ते मैदानात उतरले आहेत.
दररोज वाचा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक आता आपल्या मोबाईलवरच अमरावती वरून नियमित प्रकाशित