नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेक, 10-12 पोलिस जखमी
जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडले
पोलिस व्हॅन, बाईकची तोडफोड, हजारोंचा जमाव दाखल
सीपी, डीसीपी, एसीपींसह १२०० वर पोलिसांचा बंदोबस्त
८-१० संशयित ताब्यात
अमरावती
गाझीयाबादमधील महंत यति नरसिंहानंद यांनी एका समुदायाच्या धर्मगुरुबाबात केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्याची मागणी करीत एक शिष्टमंडळ नागपुरी गेट पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचले. मात्र त्यानंतर अचानक काही आक्रमक लोकांच्या जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु केली आणि वातावरण तापले. पोलिसांनी रोखण्याचाप्रयत्न केला असता जमाववाढत गेला आणि पुन्हा पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु झाली. यात १०- १२ पोलिस जखमी झाले. तर पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करण्यात आली. जमाव वाढत असल्याचे पाहून तत्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला आणि जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगविण्याची कारवाई सुरु होती. तर परीसरात सीपी नवीनचंद्र रेड्डीं, डीसीपी, एसीपींसह १२०० वर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गाझीयाबादमध्ये महंत यति नरसिंहानंद यांनी एका समुदायाच्या धर्मगुरुबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. धार्मिक भावना भडकविण्यात आल्याचा आरोप करीत त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करीत एका समुदायाचे शिष्टमंडळ शुक्रवारला रात्री
नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर पोहोचले. मात्र तेथेसमाधान न झाल्याने वातावरण तापले, त्यातील काही आक्रमक लोकबाहेर पडल्यानंतर लगेच जमाव झाला
आणि पोलिस स्टेशनवर दगडफेक करायला सुरुवात
केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न
केला, पण, हैदरपुरा, चाँदणी
चौक, सौदागर पुरा चौक या भागाकडून एक-एक जमाव यायला लागला टी आणि पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. या दगडफेकीत १०-१२ पोलिस जखमी झाले आहेत.
१२०० वर पोलिस दाखल
संतप्त जमावाने पोलिसांची एमएच २७ एए १८८ नंबरच्या गाडीवर दगडफेक करून तोडफोड केली. स्थिती आणखी बिघडत जात असल्याचे पाहून तत्काळ अतिरीक्त पोलिस, एसआरपीएफच्या तीन तुकड्या, दंगा नियंत्रक पथक, क्युआरटी, १० पोलिस स्टेशनचे अधिकारी, डीबी स्कॉड, एसपींसह ग्रामीण पोलिस पथक, क्राईम ब्रांचच्या दोनटिम आदींसह १२०० वर पोलिस तत्काळ दाखल झाले.
लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडले
जमाव आक्रमक आणि दगडफेक सुरुच ठेवत असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी प्रथम लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले. त्यानंतर पोलिसांनी या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला. तरी काही लोक पोलिसाची टिम एका बाजुला गेल्यानंतर दुसऱ्या बाजुने दगडफेक करीत असल्याचे चित्र होते. मात्र पोलिसांनी त्यानंतर जमाव पांगविणे सुरु केल्यानंतर उशिरा वातावरण निवळले.
दगडफेकीत १०-१२ पोलिस जखमी
संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत दीपक केशवराव तिरके (३५) एस आर पी एफ कर्मचारी अशोक हिम्मत कोल्हे (३९), एस आर पीएफ जवान अंबादास महादेवराव मोहोड, वलगाव पोलीस कर्मचारी सचिन कैलास, वाहन चालक सचिन कैलास काळे, वाहन चालक सुमित वीर सिग राठोड या पाच जणांसह आणखी पाच-सहा जण जखमी झाले आहे. या सर्वांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रात्री वातावरण शांत, जमावबंदी आदेश
दरम्यान सीपी नवीनचंद्र रेड्डी स्वतः ताफ्यासह दाखल होवून ऑनरोड उतरले आणि त्यांनी पोलिस पथकासह यापरीसरातराऊंड मारला. लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच धार्मिक स्थळावरून सुद्धा लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
दररोज सायंकाळी नियमित वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !