अमरावतीत परिस्थिती शांत, 1200 जणांवर गुन्हा दाखल
नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेकीनंतर पोलिसांची कडक कारवाई
अटकेची प्रक्रिया लवकरच होणार सुरू
अमरावती :
नागपूर गेट पोलिस ठाण्यात काल रात्री झालेल्या गोंधळानंतर आज परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 1200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 27 आरोपींची ओळख पटली आहे. अटकेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
काल रात्री, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे काही सदस्य उत्तर प्रदेशातील एका धार्मिक नेत्याने दिलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ नागपुरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. दरम्यान, काही समाजकंटकांनी अचानक पोलिस स्टेशन आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली, जो सुमारे अर्धा तास सुरू होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त फौजफाटा पाचारण करून जमावावर लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमाव पांगला. या घटनेत पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत – पहिला SDPI सचिवाच्या तक्रारीवरून हिंदू धार्मिक नेत्याविरुद्ध आणि दुसरा 1000-1200 लोकांविरुद्ध दंगल आणि पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात जमा झाला दगडांचा ढीग
काही समाजकंटकांनी शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक पोलिस स्टेशन आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली, जो सुमारे अर्धा तास सुरू होता.त्यामुळे पोलीस आवारात दगडांचा मोठ्या प्रमाणात ढीग जमा झाला आज सर्व दगड हे जमा करण्यात आले या वेळी गाड्यांचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान येत आहे.
अगदी मोफत …. नियमित वाचा आपल्या मोबाईलवरच सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा