पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पोलीस ठाणे नागपुरी गेट परिसरात कलम 163 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (क. 144 सी.आर.पी.सी.) प्रमाणे जमावबंदी आदेश लागु करण्यात आला आहे.
1) सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, कुठल्याही प्रकारचा जमाव जमवु नये तसेच कोणीही कोणत्याही प्रकारचे शस्त्र, लाठी-काठी जवळ बाळगुन संशयीतरित्या एकगठ्ठा फिरु नये.
2) कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये तसेच अफवांवर विश्वास ठेवु नये व पसरवु नये.
3) पालकांनी आपल्या मुलांना विनाकारण घराबाहेर पाठवु नये व ते कोणत्याही प्रकारच्या असामाजिक तत्वांबरोबर सामाजिक सुव्यवस्था बिघडविण्यासाठी मदत करणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे.
4) पोलीस ठाणे परिसरात सध्या शांतता असुन ती बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, अन्यथा योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
5) अमरावती शहरातील इतर पो.स्टे. हद्दीतील नागरिकांनी नमुद सुचनेप्रमाणे आपल्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था बिघडु नये यासाठी दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारच्या असामाजिक कृत्यात सहभागी होवु नये.
पोलीस आयुक्त, अमरावती शहर.
ताज्या बातम्यांचे अपडेट आणि वाचा बरेच काही
आता आपल्या मोबाईलवरच नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक मध्ये