खासदार श्रीकांत शिंदे सोमवारी दर्यापुरात
अभिजित अडसूळ साठी आखणार रणनीती तीन दिवस राहणार मुक्कामी
अमरावती
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता जोर आला असून सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागलेले आहे. महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सोमवारी दर्यापुरात तीन दिवसांसाठी मुक्कामी येणार आहेत. तर दर्यापूर विधानसभा मतदार संघातून माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची उमेदवारी पक्की मानल्या जात आहे.
हि बातमी पण वाचा — पोलीस ठाण्यावर दगडफेक १२०० जणांविरोधात गुन्हे दाखल
माजी आमदार अभिजीत अडसूळ पुन्हा एकदा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत अभिजीत अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील गटबाजीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. दर्यापूरचे आमदार असलेले अडसूळ यांना दर्यापूरमधून पुन्हा एकदा नशीब आजमावायचे आहे, अशा स्थितीत ते श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे तीन दिवस त्यांचे निवासस्थान दर्यापूर येथे असेल, तेथे अभिजीत अडसूळ निवडणुकीची रणनीती आखल्या जाणार आहे. . महायुतीने पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याच्या योजना, लाडली बहीण, शेतकरी प्रशिक्षण अशा अनेक योजना पुढे रेटल्या आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
या योजनेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा स्थितीत अमरावती जिल्ह्यातून केवळ दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सेनेच्या खात्यात आला आहे, तरीही पार्वती लोकसभा मतदार संघातून आनंदराव अडसूळ यांनी दोनवेळा, तर अभिजीत यांनी एकदा दर्यापूरचे प्रतिनिधीत्व केले आहे पुन्हा एकदा अभिजीत अडसूळ यांच्याकडून दर्यापूरच्या मातीशी नाड जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीने प्रचारास सुरुवात होणार आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सविस्तर बातमी व बरेच काही
दररोज वाचा अगदी मोफत सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा