धारणीत 10 ऑक्टोबरला सीएम शिंदेंच्या उपस्थित
आ.राजकुमार पटेलांचा शिवसेनेत प्रवेश !
अमरावती
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १० ऑक्टोंबर रोजी मेळघाट विधानसभा छेत्राच्या धारणी शहरात येणार आहे. मेळघाटचे आ. राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केल्याने धारणी शहरात १०० खाटांचे नवीन रूग्णालय, प्रशस्त बस्थानक, प्रशासकीय इमारत, पंस कार्यालय, एपीएमसीची अनेक विकाम कामे मंजूर केली आहे. या सर्व विकास कामांचे भुमिपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. येथील हायस्कुल मैदानावर हा कार्यक्रम होणार असल्याने आ. राजकुमार पटेल यांनी आज
आपल्या टीमसह हायस्कुल मैदानाची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या
कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात आ. राजकुमार पटेल हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
धारणी तालुक्यात माता व बाल मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी, आदिवासींना तातडीने सुपर स्पेशालिटीसारखा उपचार मिळण्यासाठी १०० खाटांचे शासकीय रूग्णालयाची आवश्यकता होती. भविष्याचा वेध लक्षात घेता धारणी शहरात प्रशासकीय इमारत उभारणे ही काळाची गरत होती. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समितीच्या कार्यालय इमारतीची दुरावस्था झाली होती.येथील अधिकारी, कर्मचारी बऱ्याच अडचणींचा सामना करून काम करतात. धारणी शहरात बसस्थानक आहे.
परंतु, परतवाडा डेपाच्या माध्यमातून येथील बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसेसचे शेड्यूल बनत होते.त्यामुळे धारणी शहरात प्रशस्त बस स्थानक व स्वतंत्र आगार उभारण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल केला. सर्वात महत्वाचे म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ
उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न समितीचा (एपीएमसी) नविन विकास आराखडा तयार करून शासनाकडे दाखल केला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिहवन, आरोग्य मंत्र्यांसह इतर सर्व संबधी मंत्र्यांशी चर्चा करून आ.राजकुमार पटेल यांनी सर्वप्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतले. मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामांसाठी निधी सुध्दा मंजूर केला असून १० ऑक्टोंबर पासून या विकास कामांना सुरूवात होणार असल्याने त्या कामांचे भुमिपुजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १० ऑक्टोंबरला धारणी शहरात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा येथील हायस्कुल मैदानावर होणार असल्याने आ. राजकुमार पटेल यांनी 5 ऑक्टोंबर रोजी आपल्या टीमसह हायस्कुल मैदानाची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सभेत आ. पटेलांचे भव्य शक्ती प्रदर्शन होणार असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा राजकीय वतुर्कात होत आहे.
अमरावती येथून नियमित प्रकाशित होणारा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आपल्या मोबाईलवरच कधीही कुठेही
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा