मध्यमवर्गीय वृत्तपत्रांच्या समस्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे
अमरावतीच्या मालक संपादकांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदनपोहरादेवी येथे जाण्याससाठी फडणवीस, अजित पवार यांचे झाले बेलोरा विमानतळावर आगमन

अमरावती
पश्चिम विदर्भाचे विभागीय मुख्यलय असलेल्या अमरावतीतून प्रकाशित होणार्या मध्यमवर्गीय वृत्तपत्रांच्या संपादक व मालकांनी त्यांच्या विविध समस्या घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे निवेदन त्यांना सोपविले. सोबतच निवेदनात उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
वाशीम जिल्ह्यात मानोरा तहसील अंतर्गत श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व पोहरादेवी येथे जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथून तर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे पुण्याहून विशेष विमानाने बेलोरा विमानतळ येथे सकाळी ८ वाजता आगमन झाले. तेथे प्रतिदिन अखबारचे संपादक नानक आहूजा, दैनिक अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, विदर्भ मतदारचे संपादक अॅड. दिलीप एडतकर, दैनिक जनमाध्यमचे संपादक प्रदीप देशपांडे व दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे यांनी उपस्थित राहून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समक्ष मध्यम वृत्तपत्रांसमोर निर्माण होत असलेल्या अडचणी तसेच सरकारच्या काही चुकीचे धोरण तसेच मध्यमवर्गीय वर्तमानपत्रांच्या मालक व संपादकांना भेडसावणार्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या तातडीने दूर करण्याची मागणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अमरावतीच्या मध्यमवर्गीय वृत्तपत्रांची प्रशंसा करीत वर्तमानपत्रांच्या मालक व संपादकांच्या मागण्यांवर तातडीने प्रभावी विचार करण्याचे आणि मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी विदर्भ मतदारचे सहसंपादक अक्षय एडतकर उपस्थित होते.
अमरावती येथून नियमित प्रकाशित होणारा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आपल्या मोबाईलवरच कधीही कुठेही
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा