‘मुख्यमंत्र्यांचं कार्ट’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं चोख उत्तर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.७ दर्यापूर
कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांनी रविवारी (6 ऑक्टोबर 2024) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. म्हात्रे डोंबिवलीमधून आगामी विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचं कार्ट’ असा शिंदे यांचा उल्लेख केला होता. ठाकरे यांच्या टिकेला श्रीकांत शिंदे यांनी चोख उत्तर दिलं आहे.शिंदे आज अमरावती जिल्ह्याचा दौऱ्यावर होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळला. पण, अजूनही काही लोकांची भाषा सुधारली नाही. आपलं पोरगं बाब्या आणि दुसऱ्याचं पोरगं कार्ट अशी म्हण आहे. आपल्या बाब्यानं 2-2 आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून संघर्ष करुन निवडून आलोय.
लोकसभा निवडणूक कल्याणमध्ये लढा असं आव्हा न दिलं होतं, पण ते पळून गेले, निवडणूक लढले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली आहे. काँग्रेसच्या मतावर त्यांच्या जागा निवडून आल्या. आगामी काळात काँग्रेस त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, असं उत्तर शिंदे यांनी दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहे. कुणाला कोणती जागा सुटणार हे लवकरच कळेल. कोण किती जागा लढेल यापेक्षा महायुती सरकार कसं येईल हे महत्त्वाचं आहे, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
हि बातमी पण वाचा — नवनीत राणांच्या रडावर कोण कोण
मी जनतेतून संघर्ष करुन निवडून आलोय.