पक्षभेद विसरून प्रहार रुग्णसेवकाने जोपासली माणुसकी
कट्टर राजकीय विरोधक बबलू देशमुख यांच्या वाहन चालकाला अपघात क्षणी तात्काळ दिला मदतीचा हात.
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती जिल्ह्यात बबलु देशमुख व बच्चु कडु यांची राजकीय जुगलबंदी प्रसिध्द आहे. बबलु देशमुख हे बच्चु कडु व प्रहार वर नेहमी आरोप करीत असतात. परंतु हीच प्रहार बबलु देशमुख यांच्या वाहनचालकासाठी देवदुत म्हणुन अवतरली आहे. बबलू देशमुख यांच्या गाडीवरचे ड्रायव्हर यांचा अपघात झाला असताना त्यांना कोणीही उचलायला तयार नव्हते. यावेळी प्रहारची रुग्णवाहीका हद्यरोगाचा पेशंट घेऊन अमरावती करीता येत होती. प्रहार कार्यकर्ता व रुग्णवाहीका चालक हेमंत कोंडे यांनी पक्षविरहीत माणुसकीचे दर्शन दाखवत अपघात स्थळावरुन त्यांना घेऊन इर्विन हॅास्पीटल येथे पुढिल उपचाराकरीता भरती केले.
या कृतिची सर्वत्र प्रशंसा होत आहे.