महायुती ने बंजारा समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला..
धर्मगुरु पू मा.आमदार बाबूसिंग महाराज हे नाव विधानपरिषदेच्या निमित्ताने आज जरी महाराष्ट्र व भारतातील इतर समाजाला परीचयाचे झाले असेल तरी सकल भारतातील बंजारा समाजाला हे नाव नवीन नाही. अखंड ब्रम्हचारी पूज्य रामराव बापू यांची अविरत सेवा पूज्य बाबूसिंग महाराजांच्या हातून घडली त्यांच्या हयातीत ते त्यांच्या सोबत सावलीसारखे राहिले. जगदंबा माता, संत श्री सेवालाल महाराज, स्वर्गवासी पू.रामराव महाराज यांच्या आशीर्वादाने आज बंजारा समाजाला खूप काही मिळताना दिसत आहे. भारताचे लाडके पंतप्रधान, जागतिक नेतृत्व नरेंद्र मोदी जी हे बणजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी गड येथे दर्शनाला आले, त्यांनी पू. रामराव बापू यांची इच्छा पूर्ण करून सकल बणजारा समाजाला सन्मानित केले.
१) श्रीक्षेत्र पोहरादेवी गडाच्या विकास कामासाठी ७०० कोटी रुपये इतका निधी बहाल केला. ‘नंगारा भवन’ स्थापन झाले, त्याचे भव्यदिव्य उद्घाटन समारंभ मोदिजींच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
२) *केंद्र स्थरावर बणजारा कल्याण मंडळाची स्थापना.*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लोकसभेत याची घोषणा केली. या मंडळाच्या माध्यमातून भारतभर विखुरलेल्या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निर्णयाने समाजाच्या विकासाला गती मिळेल यात शंका नाही.
३) *’तांडा समृद्धी योजना’*-
महाराष्ट्रा मध्ये महायुती सरकारने ‘तांडा समृद्धी योजना’ उदयास आणली त्या योजने अंतरर्गत प्रत्येक जिल्हा व तालुक्याला 4 अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली. १३० कोटी निधीचा पहिला टप्पा बहाल करून विकास कामे सुरु देखील झाली. यात हजारो कोटींची तरतूद केंद्र सरकारने देखील केली आहे.
४) तांड्यांना ग्रामपंचायत व महसुली दर्जा देण्यसाठी १००० लोकसंख्येची अट शिथिल करून ती ७०० लोकसंख्येची केली. ग्रुप ग्रामपंचायत मुळे विकासापासून वंचित राहिलेल्या तांड्याचा विकासाचा मार्ग मोकळा झाला.
५) *’गोर बणजारा साहित्य अकादमी’* –
बणजारा समाजाचा इतिहास हा हजारो वर्षापूर्वीचा आहे परंतू लीखित स्वरुपात काहीही नाही. गोर संस्कृतीचे जतन व्हावे व पुढच्या पिढीला समाजाची अनुभूती यातून मिळवू यासाठी सरकारने ‘गोर बणजारा साहित्य अकादमी’ सुरू केली आहे.
६) *भामटा राजपूत (SIT) स्थापन* – समाजाच्या आरक्षणाचा फायदा घुसखोर खोटे दाखले काढून घेत आहेत. अश्या अनेक घटना समोर आल्या त्यावर चौकशी होऊन कारवाई व्हावी यासाठी समिती गठित व्हावी अशी मागनी अनेक वर्षांपासून जोर धरत होती ती मागणी देखिल सारकर ने मान्य केली आहे व विशेष तपास समिती (SIT) स्थापन केली आहे.
७) *पू.बाबूसिंग महाराज यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर घेवून सन्मानित केले* – खरंतर कोणतीही आमदारकी खासदारकी मंत्री पद हे कोणत्याही समाजाच्या धर्म गुरूंना तुच्छच असते. बंजारा समाज तर करोडोच्या संख्येने भारत भरात विखुरलेला आहे. त्या समाजाचे धर्म गुरु हे पू. बाबूसिंग महाराज आहेत. कलम १७१-५ नुसार विधान परिषदेवर सदस्य (आमदार) म्हणून काही सदस्यांची निवड हे राज्यपाल करत असतात. त्यात सामाजिक, साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना निवडतात. या तरतुदी नुसार पू.बाबूसिंग महाराजांची नियुक्ती झालेली आहे हे समाजाने लक्षात घ्यावे. या नियुक्तीच्या द्वारे सकल बणजारा समाजाला सन्मानितच करण्यात आले आहे. विधान परिषदेवर राहून पू. बाबूसिंग महाराज बणजारा समाजाच्या विलक्षण संस्कृतीचे दर्शन हे भारताला घडवून आणतील हे मात्र नक्की. इतर ठिकाणी देखील अनेक संत महात्मे हे राजकारणात संविधानिक पदावर आहेतच उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथजी, राजस्थान मध्ये बाबा बालकनाथ, साध्वी निरांजन ज्योती, उमा भारती, आचार्य प्रमोद कृष्णन असे अनेक उदाहरण आपल्याला वेगवेगळ्या पक्षात बघायला भेटतील. तसेच अन्य क्षेत्रातीलही अनेक नावे असे सांगता येतील जसे सचिन तेंडुलकर, सुधा मूर्ती, लता मंगेशकर. समाजाचा विकास हा धार्मिक आणि राजकीय दोन्ही अंगाने झाला तरच समाज पुढे जातो आणि पू.बाबूसिंग महाराज ते घेऊन चालतील. समाजाचे प्रश्न योग्य रित्या मांडतील व ते इतर कोणीही मांडण्यापेक्षा प्रभावी व लक्षवेधी ठरेल हे मात्र नक्कीच.
बणजारा समाजालासाठी मागील ७० वर्षांमध्ये जे झाले नाही ते महायुती सरकारच्या काळात एका पाठोपाठ एक निर्णय घेऊन बंजारा समाजाला खर्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. या बद्दल संपूर्ण समाजात सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. महायुती व विशेष करून भाजपाचा कायम कृतज्ञ राहील.
– डॉ. आकाश राठोड