भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
नवी दिल्ली –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत १३ महिलांना स्थान देण्यात आलं आहे. त्यात खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपाने भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
कोणत्या मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी?
चिखली – श्वेता विद्याधर महाले
भोकर -श्रीजया अशोक चव्हाण
जिंतूर – मेघना बोर्डिकर
फुलंबरी – अनुराधाताई अतुल चव्हाण
नाशिक पश्चिम – सीमाताई महेश हिरे
कल्याण पूर्व – सुलभा गणपत गायकवाड
बेलापूर – मंदा विजय म्हात्रे
दहिसर – मनीषा अशोक चौधरी
गोरेगाव – विद्या जयप्रकाश ठाकूर
पर्वती – माधुरी सतीश मिसाळ
शेवगाव – मोनिका राजीव राजळे
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कैज – नमिता मुंदडा
————————————————————