आपले गांव-आपला बूथ सक्षमपणे सांभाळा;विजय आपलाच
महाविकास युवा आघाडी मेळाव्यात उसळली तरुणाईची गर्दी
अमरावती-
युवक कार्यकर्त्यांनो आपले गांव-आपला बूथ सक्षमपणे सांभाळा;विजय आपलाच असला तरी हि लढाई मोठी असल्याने कुणीही गाफील राहू नये, असे जाहीर आवाहन काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले. अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भाव येथे आयोजित महाविकास युवा आघाडी मेळाव्यात त्या उपस्थित हजारों तरुणाईच्या गर्दीला संबोधीत करीत होत्या. या मेळाव्याला खासदार बळवंत वानखडे यांचेसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देश विघातकी शक्तीच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली आहे. विरोधक विधानसभा निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखों खर्च करून मोठं-मोठे होर्डिंग लावून सरकारचे गोडवे गात असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप मित्र पक्षांकडून उधळल्या जात असलेला हा पैसा जनतेच्या घामाचा पैसा आहे. याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी सर्व भेदभाव विसरून एकजुटीने काम करावे. असे जाहीर आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला.
यावेळी या युवा मेळाव्यास खासदार बळवंतराव वानखडे, आमदार ॲड. यशोमती ठाकूर, नितिन हटवार, नरेंद्र निर्मळ, मनोज देशमुख, मोरेश्वर इंगळे, सागर देशमुख, पराग गुडधे, शिवराज चौधरी, उमेश शहाणे, मनोज अंबाडकर, गोविंद पोलाड, हरीष मोरे, हरीभाऊ मोहोड, मुकद्दर पठान, पंकज मोरे, संजय नागोने, अंसार भाई, श्रीकांत बोंडे, अमित गावंडे, वेदांत केने, हर्षल काळबांडे, डॉ. चंद्रशेखर कुरळकर, ज्योती ठाकरे, शिल्पा महल्ले, विरेंद्रसिंह जाधव, प्रविण मनोहरे, पंकज देशमुख, पंकज देशमुख, वैभव वानखडे, शैलेष काळबांडे, योगेश वानखडे, रितेश पांडव, शरद वानखडे, नंदकिशोर पोलगावंडे, अंकुश जुनघरे, निलेश कडु, मुकुंद पुनसे, राजु जुवार, सईद भाई, सौरभ किरकटे, लुकेश केने, आकाश मोहोरे, स्वराज चांगोले, हर्षल देशमुख, प्रज्योत यावले, विजय मुंडाले, श्याम बोबडे, किसन मुंदाने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
*तिवसा विधानसभा मतदारसंघ हेच माझे कुटुंब*
तिवसा मतदार संघ हाच माझा परिवार आहे. माझ्या परिवारासाठी काहीही करण्यास मी तयार असून यासाठी तिवसा वासियांच्या आशीर्वादानेच लढण्याचे बळ मिळत असल्याचे प्रतिपादन या मेळाव्यात त्यांनी यावेळी केले. आपली लढाई हि विचारांची लढाई असून ती विचारांनीच लढल्या जाणार असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
कल्पनाही करू शकत नाही अस्या घटना घडल्या
गेल्या ५ वर्षांत राज्यात अशा काही घटना घडल्या ज्यांची यापूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती. गद्दार भाजपा ने ज्या बाळासाहेबांच्या हिमतीवर राज्यात विस्तार केला त्यांनी त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना पक्ष तोडून दोन तुकडे केले. इतक्यावरच त्यांचे समाधान झाले नाही तर राष्ट्रवादी पक्षातही त्यांनी खिंडार पडून फूट टाकली आणि सत्ता हस्तगत केली. परंतु आता आपल्याला राज्य व संविधान वाचवण्याची लढाई लढून राज्याला विकसित करायचे आहे. कितीही संकटे आली तरी सत्याचाच विजय निच्छित असल्याने विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन नागरिकांची होत असलेली दिशाभूल रोखण्याचे आवाहनही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित तरूणाईस केले.