शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
मुंबई –
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यात मविआतील ३ प्रमुख पक्ष काँग्रेस-शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ८५-८५-८५ अशा जागा लढवणार आहे. २७० जागांवर तिन्ही पक्षात सहमती झाली असून उर्वरित १८ जागांबाबत मित्रपक्षांना सोडली जाईल. त्यांच्याशी उद्या सकाळपासून चर्चा होईल असं संजय राऊतांनी मविआच्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटे आधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, ती चुकून आल्याचं राऊतांनी म्हटलं.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरुस्त्या आहेत. ते कशाप्रकारे झालं, काय झालं, आमची प्रशासकीय चूक कशी काय होऊ शकली याबाबत आमचे अनिल देसाई आहेत ते या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहतात. पण उद्या आम्ही उद्या बसणार आहोत. त्यावर काही नव्याने चर्चा होतील असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे. त्यामुळे पहिल्या यादीतील काही उमेदवार बदलले जाऊ शकतात असे संकेत राऊतांनी दिले आहेत.
शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पहिल्या यादीबाबत पत्रकारांनी विचारले असता ज्या ज्या जागांवर जे काही दुरुस्ती असतील त्या करून उद्या स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.बडनेरा मधून सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे