उद्धव ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर
महविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी घेणार तीन विराट सभा
अमरावती
महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात त्यांच्या तीन ठिकाणी जंगी सभा होणार असून सभेतून ते विरोधकांवर तोफ डागणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जिल्ह्यात सभा घेणार आहेत. गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात तीन सभा घेणार आहे. दर्यापूर,वलगाव आणि बडनेरा येथे होणाऱ्या प्रचार सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वलगाव येथे होणाऱ्या सभे मध्ये ते काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रचार करणार आहेत . यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला असून त्यांच्याकरिता ही सभा महत्त्वाची ठरेल अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. यासोबतच बडनेरा येथे आणि दर्यापूर येथे देखील उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार सात नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दर्यापूर परतवाडा टी पॉइंट वलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला तीवसा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून करण्यात आले आहे.