बडनेरा मतदार संघात तुषार भारतीय यांचा संवाद झंझावात
परिवर्तनाची हाक देऊन भेटि-गाठी;मतदारांकडून भरघोस प्रतिसाद
अमरावती.
बडनेरा विधानसभा मतदार संघाचे स्वाभिमानी व जन उमेदवार श्री तुषार भारतीय यांच्या संवाद बैठकांचा झंझावात सुरु असून त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने यंदा परिवर्तन निश्चित यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विकास पासून कोसो दूर राहिलेल्या व नानाविध समस्यांनी ग्रस्त बडनेरा मतदार संघात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी नागरिकांनी आपला मतरुपी आशीर्वाद मला द्यावा, मतदारांच्या प्रत्येक मताचे मोल राखुन त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुण देण्यास मि सदैव कटिबद्ध राहिल. असा शब्द यावेळी तुषार भारतीय यांनी मतदारांना दिला.
निवडणूक प्रचार नियोजन श्रुंखलेत शनिवारी बडनेरा,चवरे नगर, महादेव खोरी, गोपाल नगर, पार्वती नगर, स्वस्तिक नगर, गडगडेश्वर परिसर, यशोदा नगर, कुंभारवाडा, नवाथे, अंबिका नगर, मोती नगर परिसरात तुषार भारतीय यांच्या संवाद बैठकां पार पडल्या. दरम्यान तुषार भारतीय यांचे ठीक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत होत असल्याने विरोधकांचे प्रेशर वाढले आहे. यंदा बडनेरा मतदार संघात परिवर्तन निश्चित असून प्रेशर कुकरच आघाडीवर आहे.