मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
विदर्भ प्रजासत्ताक
मुंबई :
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी आणि अंधेरी येथे जोरदार राडा झाला. शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मध्यरात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरेंकडून करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचे वृत्त मतदारसंघात पसरले होते. त्यामुळे जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते जाब विचारायला गेले होते. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक झाली. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला.
ताज्या बातम्यांचे अपडेट व अमरावती येथून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचण्यासाठी आजच आमच्या सोबत जॉईन व्हा !