खल्लार मध्ये नवनीत राणांचा सभेनंतर राडा
खुर्च्यांची फेकाफाक, वातावरण तापले
गावात पोलिसांचा बंदोबस्त, स्थिती नियंत्रणात; २५ जणांवर गुन्हे दाखल
दर्यापूर
दर्यापूर मतदारसंघातील युवा स्वाभीमानचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील खल्लार येथील आठवडी बाजारात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नवनीत राणा यांनी संबोधित केले. सभा संपल्यानंतर नवनीत राणा परत जात असताना क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होवून काही समाजकंटकांनी प्रचंड राडा करीत नवनीत राणांवर खुर्चा फेकल्या. यामुळे सभास्थळी खळबळ उडून दोन्ही बाजूने एकमेकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी ७ वाजता खल्लार येथील आठवडी बाजारात रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला नवनीत राणा संबोधित करीत असताना व्यासपिठाच्या बाजूला असलेल्या काही टवाळखोर युवकांनी शेरेबाजी केल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना हटकल्यानंतर वाद सुरू झाला. सभा संपल्यानंतर नवनीत राणा ह्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कारकडे जात असताना अचानक काही युवकांनी सभास्थळी असलेल्या खुर्चा नवनीत राणा यांच्यावर फेकल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी नवनीत राणा यांना सुरक्षा प्रदान करीत बाजूला नेल्यानंतर दोन्ही
बाजूंनी एकमेकांवर खुर्चा फेकण्यात आल्या. तसेच एकमेकांना मारहाणही करण्यात आली. परिणामी उपस्थित गावकऱ्यांनी मिळेल त्या दिशेने पळ काढत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला.
चिथावणीखोर नारेबाजी
याठिकाणी दोन-तीन पोलीस उपस्थित होते. परंतू टवाळखोर युवकांनी त्यांना न जुमानता खुर्च्यांची तोडफोड करीत नारेबाजी देखील केली. चिथावणीखोर नारेबाजी के ल्याने वातावरण आणखी
चिघळले आणि दोन्ही बाजूंनी खुर्च्य एकमेकांना मारून फेकत प्रचंड धुमाकूळ घातला. या राड्यामध्ये दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून अनेकजण किरकोळ जखमी झालेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ खल्लार गावात धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवित पोलीस ताफा तैनात केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी
खल्लार येथे झालेल्या राड्यानंतर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, सभा सुरू असताना काही युवकांनी शेरेबाजी केल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी हटकले. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असून आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ शकतो. परंतू ती आमची संस्कृती नाही, स्वभाव नाही आणि पक्ष देखील तसे करायला सांगत नाही. झालेला प्रकार अतिशय निंदनिय असून पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाई करून हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
विरोधक म्हणतात नौटकीला उधाण
जिल्ह्याभरात युवा स्वाभिमानची पडती बाजू दिसत असल्याने मतदारांची खोटी सहानूभूती मिळविण्यासाठी खल्लार येथे स्वत :च युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करवून घेवून निवडणूकीच्या तोंडावर ही नौटंकी होणार हे ठरलेले होते. गेल्या निवडणूकीमध्ये वरुड मतदारसंघात वाहन पेटवून जनतेची सहानभूती मिळविला असल्याचा अनूभव अमरावतीकरांना आहे, त्यातलाच हा प्रकार आहे असल्याचे विरोधकांनी म्हंटल आहे.
जिल्ह्याभरात युवा स्वाभिमानची पडती बाजू दिसत असल्याने मतदारांची खोटी सहानूभूती मिळविण्यासाठी खल्लार येथे स्वत :च युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करवून घेवून निवडणूकीच्या तोंडावर ही नौटंकी होणार हे ठरलेले होते. गेल्या निवडणूकीमध्ये वरुड मतदारसंघात वाहन पेटवून जनतेची सहानभूती मिळविला असल्याचा अनूभव अमरावतीकरांना आहे, त्यातलाच हा प्रकार आहे असल्याचे विरोधकांनी म्हंटल आहे.