भाजपाने पहिल्यांदाच केली व्हॉट्सॲप प्रमुखाची नियुक्ती, अशी असेल जबाबदारी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१७नवी दिल्ली
मागच्या काही वर्षांमध्ये भाजपानेमध्य प्रदेशला आपला बालेकिल्ला बनवलं आहे. मध्य प्रदेशमध्ये भक्कम पक्ष संघटनेच्या जोरावर भाजपाने मागच्या २०-२५ वर्षांपासून अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने विजय मिळवला आहे. आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात भाजपाने पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्यासाठी पहिल्यांदाच व्हॉट्सॲप प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यातील पहिल्या व्हॉट्सॲप प्रमुखाची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे.
भोपाळमध्ये राहणाऱ्या रामकुमार चौरसिया यांची भाजपाचे मध्य प्रदेशमधील पहिले व्हॉट्सॲप प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रामकुमार चौरसिया यांनी एमएससीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. मूळचे राजसेन जिल्ह्यातील रहिवासी असलेले रामकुमार चौरसिया हे मागच्या ३० वर्षांपासून भोपाळमध्ये राहत आहेत.
या नियुक्तीनंतर रामकुमार यांनी सांगितले की, भाजपाने मला राज्यातील पहिला व्हॉट्सॲप प्रमुख बनवलं आहे. पक्षाची विचारसरणी आणि सरकारी योजनांची माहिती बूथमधील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल.