
नवनीत राणा यांची दर्यापूरात महारॅली
रॅलीत झळकले ‘हिंदू शेरणी ” चे पोस्टर
दर्यापूर
अमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार गावात काल भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत झालेल्या राड्यानंतर आज दर्यापूरात महारॅलीचे आयोजन कऱण्यात आले होते. या रॅली ला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आज पहावयास मिळाले
युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ दर्यापूरच्या मलीयेपूर येथून निषेध रॅलीला सुरवात कऱण्यात आली या प्रचार रॅली आणि कालच्या राड्याच्या घटनेचा केला जाहीर निषेध नागरिकांनी केला त्या नंतर गांधी चौकात निषेध सभा घेण्यात आली
या निषेध रॅलीत भाजप,युवा स्वाभिमान व हिंदुत्ववादी पीपल्स रिपब्लिकन पार्टी मतदारसंघातील भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले, लहूजी शक्ती सेना, शेतकरी संघटना व राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवारअनेक सामाजिक संघटनांचा सहभाग होता.
आज निघालेल्या प्रचार व निषेध रॅलीत नवनीत राणा यांचा “हिंदु शेरणी” अशा बॅनरचा उल्लेख झळकला काल खल्लार येथे माझ्यावर समाज कंटकांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज दर्यापूर येथे गावा गावातून हजारो मातृ शक्ती, पितृ शक्ती, युवक युवती मैदानात…आज माझ्या वर हल्ला केला उद्या माझ्या अनेक बहिणींवर हल्ला होऊ शकते हे मी खपवून घेणार नाहीअशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनि यावेळी बोलतांना दिली
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !