बडनेरात परिवर्तणाचा नारीशक्तीचा निर्धार
तुषार भारतीय यांच्यासाठी महिलांची स्वयंस्फुर्त महापदयात्रा
अमरावती,
बडनेरा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तुषार भारतीय यांच्या समर्थनार्थ रविवारी (ता.१७) महिलाशक्तीने स्वयंस्फु्र्तीने महापदयात्रा काढून मतदारांना आवाहन केले.शेकडो महिला, युवतींच्या सहभागाने या प्रचारयात्रेने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते.आगे बढो सबसे आगे बढो या घोषणांनी प्रचारयात्रेचा परिसर दणाणून गेला.बडनेरा मतदारसंघातून महापालिकेचे माजी सभापती तुषार भारतीय अपक्ष निवडणूक लढवित आहेत.त्यांना नारीशक्तीने समर्थन देत प्रचारयंत्रणा राबविली आहे.रविवारी सकाळी ११ वाजता नवाथे चैक येथून प्रचारयात्रेस जोशात प्रारंभ झाला.मतदारसंघातील शेकडो महिला व युवती या प्रचारयात्रेत स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्या होत्या.उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणा व भविष्यातील विकास कामांची रूपरेषा सहभागी नारिशक्तीने मतदारांसमोर मांडत सहकार्याचे आवाहन केले. नवाथे चैाक येथून प्रारंभ झालेली ही प्रचार यात्रा राजापेठ,कंवर नगर,कल्याण नगर,मोती नगर अशी मार्गक्रमण करीत अंबिका नगर येथे पोहोचली.अंबिका नगर मैदानावर या प्रचार यात्रेचा समारोप झाला.गेल्या पंधरा वर्षांपासून विकासापासून दुर राहलेल्या बडनेरा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडवायचा निर्धार प्रचार यात्रेतील नारीशक्तीने यावेळी व्यक्त केला.तुषार भारतीय यांची प्रचारयंत्रणाच आता नारीशक्तीने स्वयंस्फुर्तीने हाती घेतली आहे. समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नारीशक्तीचा निर्धार व प्रचारातील जोश वाखाणण्याजोगा होता.महिलांनी दिलेल्या परिवर्तनाच्या घोषणांनी मतदारांचे लक्ष आकर्षून घेतले.चुल आणि मुल यापुरत्या आता महिला मर्यादीत राहल्या नसून त्या परिवर्तणही घडवू शकतात असा संदेश या महापदय़ात्रेने आज दिला.बडेनरा मतदारसंघात त्यामुळे आता तुषार भारतीय यांचे पारडे जड झाले असून विरोधक चांगलेच धास्तावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.—-
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !