
अडसड यांच्या बहिणीवर चाकू हल्ला; कारच्या काचा फोडल्या
धामणगाव-तळेगाव मार्गावर सातेफळ फाट्याजवळ घटना
चांदूर रेल्वे
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोटे (५०) यांच्यावर चाकू हलका करण्यात आला. तसेच त्यांच्या कारच्या काचाही फोडल्या. दोन हल्लेखोर हल्ला करून पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना सोमवारी १८ नोव्हेंबरला रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.


अर्चना रोटे, चालक आणि अन्य दोन व्यक्ती असे कारने घुईखेडवरून धामणगावला परत येत होते. दरम्यान सातेफळ फाट्यापासून २०० मीटर अंतरावर अर्चना रोटे काही कारणास्तव कारच्या खाली उतरल्या. त्यावेळी चालक आणि अन्य कारमध्येच बसून होते. त्याचदरम्यांन अर्चना रोटे यांच्यावर दोन जणांनी चाकूने हल्ला चढवला. या चाकू त्यांच्या हाताला लागला. चाकूचे तीन वार त्यांच्या हातावर लागलेले आहेत. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुरुवातीला त्यांना चांदूर रेल्वे येथे आणण्यात आले होते. दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच आमदार प्रताप अडसड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते चांदूर रेल्वे येथे पोहोचले होते.
या प्रकारामुळे मतदारसंघात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यासमोर कार्यकत्यांची गर्दी ठाण्यासमोर गर्दी जमली होती.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !