
बच्चू कडूंची सभा नयनाताईंनी गाजवली
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१८परतवाडा
अचलपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षे एक हाती सत्ता गाजवणारे आमदार बच्चू कडू हे हे आता पाचव्यांदा आमदार होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रहार ने भव्य बाईक रॅली काढून विरोधकांची धाबे दणाणून दिले. चांदूरबाजार येथून सुरू झालेल्या बाईक रॅलीचा समारोप अचलपूर येथील गांधी पुलाजवळ बच्चू कडू यांच्या जाहीर सभेने झाला आमदार कडू बोलत असतांना म्हणाले हाडामासाचा कार्यकर्ता जेव्हा उभा होतो तेव्हा इतिहास घडतो. बच्चू कडू म्हणाले आजच्या विराट सभेने दाखवून दिले की बच्चू कडू ची खरी ताकद काय आहे. बच्चू कडू ची खरी ताकद सामान्य जनता आहे. ही लढाई हिंदू मुसलमानांची नसून ही लढाई हक्काची आहे. बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता फिरत असताना अचलपूर मतदार संघातील माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी गाव खेड्यात जाऊन माझा प्रचार केला. महाराष्ट्रात बटेंगे तो कठेंगे हे चालणार नाही. आम्ही हिंदुस्तान ला जोडायला निघालो. बच्चू कडू 23 तारखेला सरकार बनवायला निघणार आहे असा ठाम विश्वास आमदार कडू यांनी आपल्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.
संपूर्ण विषारी सापांची दात छाटण्याचे काम माझ्या गारुडीने केले — नयना ताई कडू
तुम्ही आमदार बच्चू कडू यांना गारुडी म्हणून बोलता जर आम्ही गारुडी आहोत तर आमच्यासारखे गारोडी होऊन दाखवा. आमदार कडू हे 12महिने 365 दिवस जनतेच्या सेवेत असतात.तुम्हाला वीस वर्षात अजून दुसरा शब्द सुचला नाही. या गारुडीने संपूर्ण विषारी सापांचे दाट छाटण्याचे काम केले आहे हे विसरता कामा नये. कोणी ऐयरा गयरा नत्थू खैरा आमदार कडू यांच्यावर टीका करेल हे मतदार संघातील जनता खपून घेणार नाही येणाऱ्या 20 तारखेला जनता विरोधकांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्माची खरी व्याख्या जर ओळखायची असेल तर राजे शिवछत्रपती महाराजांचा इतिहास वाचा त्या इतिहासात तुम्हाला खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची शिकवण काय असते हे समजेल. जाती जाती तेढ निर्माण करून मतदान मिळवता येत नाही. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे इथे विचारांना महत्त्व आहे. नयना ताई बोलत असताना त्यांनी जाहीरपणे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना आव्हान केले. निवडणुकीची धामधूम संपली की माझ्या कुरडच्या घरी या आणि एकदा फार्म हाऊस बघूनच घ्या. तिथे रोज सकाळी 200 ते 300 दिव्यांग बांधव शेतकरी बांधव निराधार बांधव आपल्या समस्या घेऊन येतात आणि त्या समस्यांना सोडवण्याकरता बच्चू कडू नावाच रसायन हे नेहमी उपलब्ध असते. ते सुद्धा आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघून घ्यावे. नयना ताई चे भाषण सुरू असताना सभेतील अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाले. नयना ताईच्या भाषणातील एक एक शब्द या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याकरिता होता.