मेरा रंग दे बसंती चोला म्हणत निघाली बच्चूकडूंची ची भव्य बाईक रॅली
बाईक रॅलीने मोडले सर्व विक्रम तुफान गर्दी तीस हजार तरुणांचा सहभाग
अजिंक्य रॅलीने धास्तावले विरोधक
परतवाडा
अचलपूर विधानसभा मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून आमदार बच्चू कडू यांचा दबदबा कायम आहे. या वेळी या मतदार संघात तिरंगी लढत आहे. या लढतीत आमदार बच्चू कडू यांचाच वरचष्मा असल्याचे राजकीय जानकार बोलत आहे.
प्रहारच्या बाईक रॅलीमध्ये तुफान गर्दी असून तीस हजार तरुणांचा सहभाग होता ही गर्दी विजयाची साक्ष देते.
चांदूरबाजार येथून सुरू झालेली बाईक रॅली तब्बल 15 किलोमीटर अंतराची बाईक रॅली असून संपूर्ण शहर हे प्रहारमय झाले असल्याचे चित्र पाहायला शहरवासीयांना मिळाले. गाव खेड्यातील कार्यकर्ता स्वफुर्तीने प्रहारच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन आमदार बच्चू कडू यांना पाचव्यांदा विजय करण्याकरता पाठिंबा दर्शविला आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणत्या राजकीय पक्षाची रॅली निघाली नाही.त्याचे मुख्य कारण म्हणजे आमदार बच्चू कडू हे एक राजकीय पक्षाचे नेते असून सुद्धा ते लोकांमध्ये वावरताना एकदम जनसमान्यासारखे राहतात. आणि नेहमी लोकांच्या मदतीला धावणारा नेता, दिव्यांगाच्या मदतीला धावणारा नेता, शेतकरी हितार्थ शासनाला धारेवर धरणारा नेता म्हणजे आमदार बच्चू कडू जेव्हा आमदार बच्चू कडू विधानसभेत बोलतात तेव्हा 288 आमदारापैकी एक महाराष्ट्राचा वाघ आमदार म्हणजे बच्चू कडू हा शेतकऱ्यांची बाजू प्रखरपणे मांडताना दिसतो. म्हणूनच आज पाचव्यांदा बच्चू कडू हे विजयाच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्राचा रुग्णसेवक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. प्रहार चा कार्यकर्ता हा रुग्णसेवेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. आज पर्यंत एक लाख रुग्णांवर ऑपरेशन करून त्यांना जीवनदान देण्याचे काम प्रहार न केले. मतदार संघात पाच वर्षात 6700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून. आज मतदारसंघात विकासाचे कामे सुरू आहे बच्चू कडू यांचा इतिहास आहे जेव्हा ती त्यांची रॅली काढतात त्याच दिवशी त्यांचा विजय नक्की होतो पण त्यांची रॅली म्हणजे विजयाची रॅली असते. हल्ली आपण पाहतो पैसे देऊन सुद्धा लोक गोळा होत नाही. पण प्रहार चा कार्यकर्ता हा नेहमी आमदार कडू यांच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो आणि आमदार कडू ही त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकतीने उभे असतात. प्रहार एक पक्ष नसून एक चळवळ आहे
आणि त्या चळवळीचा प्रमुख उद्देश म्हणजे जिथे नागरिकांवर अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ही चळवळ करते
*शहराच्या इतिहासात भूतो न भविष्य निघालेली रॅली*
प्रहार चा कार्यकर्ता हा महाराष्ट्र भर असून आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते गावोगावी आहे. आज बच्चू कडू यांच्या अजिंक्य रॅलीमध्ये कार्यकर्ते या रॅलीमध्ये जवळपास 11600 दुचाकी शंभरच्या वर चार चाकी वाहने असा एकंदरीत ताफा होता कार्यकर्ते एवढ्या मोठया प्रमाणात सहभागी झाले कि विरोधकांनी या गर्दीची धडकी घेतली.मेरा रंग दे बसंती चोला मनत कार्यकर्त्यांनी भाऊंच्या अजिंक्य रॅलीमध्ये सहभाग दर्शविला.