भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ अमरावती जिल्हा दौऱ्यावर….
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघातील भाजप उमेदवार तथा विद्यमान भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोटे यांच्यावर व गाडीवर सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र अर्चना रोटे यांनी तो हल्ला परतवून लावत आपल्या हातावर झेलला या हल्यात त्यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांच्यावर अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून
अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व अर्चना रोठे यांना भेटण्यासाठी चित्रा वाघ रुग्णालयात दाखल होत त्यांच्यवर झालेल्या हल्ल्याची माहिती जाणून घेतली
सोमवारी सातेफळ फाट्यावरून जात असताना अज्ञात हल्लेखोरानी गाडीवर हल्ला चढवला होता
मुंबई मधून चित्रा वाघ आज अमरावतीत आल्यात चित्रा वाघ यांनी अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिलाहल्ला कसा झाला याची चौकशी करून दोषींना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली
सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होत आहे
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !