मविआ उमेदवार सुनील खराटे यांना जीवे मारण्याची धमकी
राजापेठ पोलीस स्टेशनवर धडकले शिवसैनिक
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे दबावतंत्र
अमरावती
सोमवारपासून निवडणुकीच्या प्रचारतोफा थांबल्या आहेत त्यामुळे विरोधकांनी आता दबावतंत्रांचा वापर करण्यास सुरुवात केली असून काल मध्यरात्री बडनेरा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील खराटे आपल्या प्रचार कार्यालयात बसले असतांना एका निनावी भ्रमणध्वनी वरून त्यांना फोन आला असता अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. त्यामुळे संतप्त शिवसैनिक मंगळवारी सकाळी राजापेठ पोलीस स्टेशनवर धडकले. सुनील खराटे यांनी रीतसर राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपीवर कडक कार्यवाही करण्याची त्यांनी विनंती केली.
सोमवारी सायंकाळी ५ वाजतापासून प्रचारतोफा थंडावल्या त्यामुळे उमेदवार आता गुप्त प्रचाराकडे लक्ष देत आहे.सोमवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान सुनील खराटे हे काही शिवसैनिकांसह प्रचार कार्यालयात बसले असतांना त्यांना ८०१०६३४९३६ या क्रमांकावरून एक कॉल आला. सुनील खराटे यांनी नेहमीप्रमाणे तो निनावी कॉल उचलला मात्र अचानक समोरून अश्लील शिवीगाळ करत, तू कसा जिंकून येतो ते बघतो तेच बघतो,तुला जिवाने मारून टाकू अश्या धमक्या देण्यात आल्या. सुनील खराटे यांना काही कळायच्या आतच आरोपीने फोन कापून बंद करून ठेवला.
आज सकाळी सुनील खराटे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राजापेठ पोलीस स्टेशनला धडक देऊन तानाशाही नही चलेगी च्या घोषणा दिल्या. तसेच आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. सुनील खराटे यांनी आपली रीतसर तक्रार दाखल करून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आहे.पुढील तपास राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत असून अद्याप आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही हे विशेष!
विरोधकांना पराभव स्पष्ट दिसतो आहे.
आम्ही लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढत असून आमचा विजय निश्चित असल्याने विरोधकांना धास्ती निर्माण झाली आहे.त्यामुळे ते आम्हाला धमक्या देऊन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमच्या कार्यकर्त्याला देखील असेच धमकवण्यात आले होते त्यामुळे विरोधकांच्या सुद्धा हे लक्षात आले आहे की,या निवडणूकीत त्यांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी हा धमक्यांचा प्रकार सुरू केला आहे. मात्र आम्ही शिवसैनिक आहो कुणालाही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया सुनील खराटे यांनी माध्यमांना दिली.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या https ://epaper.vidarbhaprajasattak.com साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !