23 नोव्हेंबर रोजी आठही मतदारसंघाचे मतमोजणीचे ठिकाण जाहीर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२१अमरावती,
संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 (बुधवार), रोजी मतदान होत असून मतमोजणी ही शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 (शनिवार) रोजी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी ठिकाणी व मतमोजणीच्या वेळी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये जिल्ह्यामधील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खालील दर्शविण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत खालील बाबी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
36-धामणगाव रेल्वे मतमोजणीचे ठिकाण आय. टी. आय कॉलेज, विरूळ रोगे रोड, ता. चांदुर रेल्वे, 37-बडनेरा मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, ता. जि. अमरावती, 38-अमरावती मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, ता. जि. अमरावती, 39-तिवसा मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय, तिवसा नवीन इमारत तिवसा, 40-दर्यापूर मतमोजणीचे ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, बनोसा, ता. दर्यापूर, 41-मेळघाट मतमोजणीचे ठिकाण नवीन प्रशाकीय इमारत, मेन रोड, ता. धारणी, 42-अचलपूर मतमोजणीचे ठिकाण कल्याण मंडपम् परतवाडा, ता. अचलपूर, 43-मोर्शी मतमोजणीचे ठिकाण शासकीय धान्य गोडाऊन, नं.1 ता. मोर्शी येथे राहणार आहे.
उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणलाही मतमोजणी स्थळांच्या शंभर मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. मतमोजणी ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच मतमोजणी ठिकाणाच्या शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीस्टर, कॅलक्यूलेटर इत्यादी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात येत आहे.
मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात येत असून त्यामध्ये निवडणूक कामाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश मिळणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याता येत आहे. हा आदेश उपरोक्त नमूद केलेल्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील.