२३ ते २७ फेऱ्यानंतर ठरणार आमदार
२३ नोव्हेंबरला सकाळी ८ पासून प्रक्रिया: प्रत्येकी १४ टेबलांवर होणार मतमोजणी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२१अमरावती :
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येकी १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. शिवाय, पोस्टल व ईटीपीबीएस यांचे टेबल स्वतंत्र राहणार आहेत. मतमोजणीच्या २३ ते २७ फेऱ्या होणार आहेत. यामध्ये तिवसा, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी मतदारसंघात २३ फेऱ्या असल्याने लवकर निकाल लागणार आहे.
मतमोजणीसाठी केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी अधिकारी, एक मतमोजणी: सहायक व एक मायक्रो ऑब्झर्व्हर राहणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
या सर्व प्रक्रियेला किमान ५०० वर मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबल राहतील. मतमोजणीला सुरुवात होताच अन्य टेबलांवर टपाली मतदान व ईटीपीबीएस मतपत्रिका यांची मोजणी सुरू होईल.साधारणपणे टपाली मतदानासाठी पाच ते सात टेबल राहणार आहेत. शिवाय, ईटीपीबीएससाठी एक ते पाच टेबल राहणार आहेत. मतमोजणीला ५०० वर अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत. या सर्व मनुष्यबळाचे पहिले प्रशिक्षण आटोपले. दुसरे प्रशिक्षण २२ नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या https ://epaper.vidarbhaprajasattak.com साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !