‘सकाळ’ आणि साम टीव्ही च्या एक्झिट पोलनुसार,
दर्यापूरमध्ये गजानन लवटे होणार आमदार?
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२१अमरावती
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या गजानन लवटे यांनी निवडणूक लढवली. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या अभिजीत अडसूळ यांनी निवडणूक लढवली.
या मतदारसंघामध्ये राणा दाम्पत्यांनी देखील आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला होता. दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गजानन लवटे आणि अभिजीत अडसूळ यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. या दोघांपैकी कोण विजयी होणार याबाबत सकाळच्या एक्झिट पोलमधून महत्वाची माहिती समोर आली आहे.सकाळच्या एक्झिट पोलनुसार, दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवेसना ठाकरे गटाला मोठं यश येणार आहे. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे गजानन लवटे हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अभिजीत अडसूळ यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसू शकतो.
अभिजीत अडसूळ यांचे वडील या ठिकाणावरून खासदार होते. पण त्यांचा पराभव नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर विधानसभेला अभिजीत अडसूळ यांना महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये खूप फूट पाहायला मिळाली.
दर्यापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांचा प्रचार न करता रवी राणा यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. यामुळे या मतदारसंघामध्ये महायुतीला फटका बसून मविआला फायदा होणार असून ठाकरे गटाचे गजानन लवटे हे विजयी होण्याची शक्यता आहे.
हे एक्झिट पोल आहेत याचे अंदाज चुकू सुद्धा शकतात.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या https ://epaper.vidarbhaprajasattak.com साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !