‘सकाळ’ आणि साम टीव्ही च्या एक्झिट पोलनुसार,
अमरावतीतून कोण निवडून येणार? एक्झिट पोलमधून संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर
दि.२१अमरावती
अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांना मतदारांनी कौल दिल्याचं ‘सकाळ’व साम टीव्ही च्या एक्झिट पोलच्या अंदाजातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे खोडके या अमरावतीच्या संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे.
अमरावती मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे सुनील देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. या निवडणुकीसाठी काल, बुधवार, २० नोव्हेंबरला मतदान झालं. आता २३ तारखेला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी मतदान झाल्यानंतर सकाळ समूहानं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये या मतदारसंघातून सुलभा खोडके या संभाव्य आमदार असतील, असं सांगण्यात आलं आहे. खोडके यांच्यासमोर काँग्रेसच्या देशमुख यांचं तगडं आव्हान होतं.सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमरावती मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीत सुलभा खोडके यांनी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले होते. तर या निवडणुकीच्या आधी खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेसकडून सुनील देशमुख हे रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली.
भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता देखील निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळं मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत अल्पसंख्याकांची मते निर्णायक ठरली होती. आता विधानसभा निवडणुकीत ही मते कुणाच्या पारड्यात पडतात, यावर येथील संभाव्य आमदार ठरणार आहे, असे बोलले जात आहे. दरम्यान, हे एक्झिट पोलमधील प्राथमिक अंदाज आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार हे २३ तारखेलाच स्पष्ट होईल.
हे एक्झिट पोल आहेत याचे अंदाज चुकू सुद्धा शकतात
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या https ://epaper.vidarbhaprajasattak.com साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !