
मतमोजणीची प्रतीक्षा,नियोजन पूर्ण,अचलपूर मध्ये २३ फेऱ्या
बच्चु कडू,प्रवीण तायडे, बबलू देशमुख यांच्यात”काटे की टक्कर”
लाडकी बहीण प्रभावित ठरणार, आमदार होण्याचं भविष्य कुणाचं?
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२ चांदूर बाजार
विधानसभा निवडणुकीसाठी अचलपूर मतदारसंघात २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रहार पक्षाचे विधमान आमदार बच्चु कडू,महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे व महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याच चित्र दिसत आहे बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे अचलपूर येथे स्ट्रांग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल यांच्यासह राखीव पोलिस दल तसेच पोलिस तैनात आहेत स्ट्रॉग रूम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे तर एकी कडे अचलपूर मतदार संघात आमदार कोण होणार कुणाला की मते मिळणार याची चर्चा गावातच नाही तर शहरातील चोका-चोकात पान टपरीवर होत आहे तर विविध ठिकाणी १०-१० च्या जत्ता पाहायला मिळत आहे पाचव्यांदा २० ते २५ हजार मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास आमदार बच्चू कडू यांना आहे भाजपा च्या प्रवीण तायडे यांच्या साठी लाडकी बहीण प्रभावित ठरू शकते तर बबलू देशमुख सुद्धा विजय होणार असल्याचा भूमीकेवर ठाम मत पेटी मध्ये आमदार होण्याचं भविष्य कुणाचं कैद आहे हे उद्या २३ नोव्हेंबरला समजणार आहे मतमोजणी केंद्रांवर २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल सुरुवातीला टपाली मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल अचलपूर मतदारसंघात एकूण २३ फेऱ्या राहणार आहे प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत आरखराव , पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेसाठी पोलिस दलासोबत अन्य यंत्रणांचेही मनुष्यचळ तैनात करण्यात आले आहेत मत मोजणी नंतर कुणाचा गुलाल उधळणार कोण आमदार होणार यावर अचलपूर मतदारसंघातील जनतेला चाहूल लागलेली आहे.
प्रवीण तायडे साठी लाडकी बहीण चमत्कार करणार?
यंदा महिलांनी उत्साही मतदान केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे अचलपूर मतदारसंघात ९८४८२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि एस.टी. मध्ये निम्म्या तिकीटदारत प्रवास ही यामागील कारणे असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे लोकसभा निवडणुकीत संविधान बदल आणि आरक्षण हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते मात्र विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मुद्दे गौण ठरले याचाच मोठा फायदा महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे यांना होऊ शकते आणि लाडकी बहीणच चमत्कार करणार असल्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
वाढीव मतदानाने उमेदवारांना धडकी भरली?
अचलपूर मतदारसंघात एकूण ७२.१४ टक्के मतदानाची नोंद झाली एकून २१०६१६ मतदानाची नोंद झाली आहे ११२१३१ पुरुषांनी मतदाचा हक्क बजावला इतर १ मतदारांनी सुद्धा मतदान केल तर या निवडणुकीत प्रभावित ठरू शकणाऱ्या ९८४८२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे वाढीव मतदानाने उमेदवारांना धडकी भरली आहे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये विविध आडाखे बांधले जात आहेत.