धाकधूक वाढली कोण होणार विजयी कोणाची होणार हार ?
उद्या दुपारपर्यंत अमरावती जिल्ह्यातील निकालाचा कौल होणार स्पस्ट
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२अमरावती
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तासच शिल्लक उरले असतांना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या दिल कि धडकन वाढली असून उद्या दुपारपर्यंत अमरावती जिल्ह्यातील निकालाचा कौल स्पस्ट होणार आहे.अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडली उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आहे. अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी कुणाच्या बाजूने मतदान केले याचे चित्र उद्या स्पस्ट होणार आहे.आठ पैकी दोन मतदार संघात अपक्ष आणि इतर उमेदवारांनी आपला प्रभाव दाखविला त्यामुळे आता अपक्ष सोडून महाविकास आघाडी कि महायुती किती जागा राखते या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बडनेरा,तिवसा ,अचलपूर आणि अमरावती या मतदार संघात दिगज्जांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दर्यापूर,धामणगाव रेल्वे मोर्शी,आणि मेळघाट या ठिकाणी निवडणूक टस्सल ची झाली आहे. त्यामुळे कोणाचा गुलाल उधळणार हे बघणे औसुक्याच ठरणार आहे.
लोकसभेच्या तुलनेत 3 टक्के मतदान वाढले• विधानसभा निवडणुकीत यावेळी देखील स्वीप अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत ३ टक्क्याने मतदान वाढले आहे. लोकसभेत ६३.५८ टक्केपर्यंत निवडणुक विभागाने मजल मारली होती. विधानसभेत मात्र ही टक्केवारी ६६.४० टक्केवर पोहचल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे.