
जरांगेंचे आंदोलन लाडक्या बहिणींपुढे फोल:मराठवाड्यात लोकसभेप्रमाणे जरांगे फॅक्टर चालला नाही
विदर्भ प्रजासत्ताक
मराठवाड्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जरांगे फॅक्टर चालणार असे चित्र होते. मात्र, यावर लाडक्या बहिणीने मात केल्याचे चित्र दिसून आले. एकूणच महायुतीला मराठवाड्यात ४० जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मराठवाड्यात जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरला. जरांगेंच्या मराठा आंदोलनावर विसंबून परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला ७ जागा गमवाव्या लागल्या. २०१९ मध्ये मराठवाड्यातील ४६ पैकी १२ जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. या वेळी सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हे तीन ज्वलंत विषय आणि उबाठासारख्या तिसऱ्या मित्रपक्षाची साथ मिळाली, मात्र सात जागा गमवाव्या लागल्या.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले होते. जरांगेंच्या आदेशामुळे भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गजांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. या वेळी त्यांचे पुत्र संतोष आणि मुलगी संजना दोघे विजयी झालेत.
आमच्या वेब साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com