भाजपच्या त्सुनामीने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढी राहिली नाही उद्धवसेनेची पात्रता
विदर्भ प्रजासत्ताक
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी इतिहास घडवला. २८८ पैकी तब्बल २३० जागांवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरघोस मतांनी विजयी करत एकहाती सत्ता दिली. यात भाजपला १३२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. यापूर्वी १९७२ मध्ये काँग्रेसचे २२२ आमदार विजयी आले होते. महायुतीने हा विक्रम मोडत इतिहास रचला. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला ४६ जागांवर गुंडाळत एेतिहासिक पराभवाची नामुष्की दिली.
यापूर्वी २०१४ मध्ये स्वबळावर लढताना भाजपने १२२ जागा पटकावल्या होत्या, या वेळी त्यांनी स्वत:चाही िवक्रम मोडला. २०१९ मध्ये विधानसभेला ६१% मतदान झाले होते. या वेळी त्यात ५% वाढ होऊन ६६% मतदान झाले. हे वाढलेले मतदान महायुतीच्या पदरात पडले. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. आता महायुतीचे नेते सत्तास्थापनेचा दावा सादर करणार असून २५ नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदावर प्रबळ दावा आहे. दरम्यान, एकूण २८८ जागांपैकी १०% जागा मविआत एकाही पक्षाला न मिळाल्याने विरोेधी पक्षनेता करणेही उद्धव सेनेला अवघड झाले आहे.
विजयाची कारणे : भाजपच्या लाटेत चालला नाही जरांगेंचा ‘पाडापाडी’ पॅटर्न
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेतून दरमहा २.३० लाख महिलांना १५०० रु. दिले. सत्ता आल्यास २१०० रुपये देण्याचे आश्वासन. महिलांची मते त्यामुळे मोठ्या संख्येने युतीला.
आरक्षणाचा रोष घटला
मराठा आरक्षणाचा उमटलेला रोष आता खूपच कमी झाला. मनोज जरांगेंच्या बदलत्या भूमिकेमुळेही मराठा मतदार पुन्हा महायुतीकडे. ओबीसींचीही एकगठ्ठा मते.
शेतकरी कर्जमाफी
कापूस, सोयाबीनसह इतर पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज. पण कर्जमाफीचे आश्वासन दिल्यामुळे तो रोष कमी होऊन ही मते पुन्हा महायुतीकडे.
बटेंगे कटेंगे, संघाचीही साथ
संघाचे मायक्रो प्लॅनिंग यशस्वी. एकूण मतदान ५ % वाढले ते युतीला लाभदायी. बटेंगे.. कटेंगेच्या घोषणेने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश आल्याने फायदा.
https://epaper.vidarbhaprajasattak.com