जिल्ह्यात 160 पैकी, तब्बल 143 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
१७ उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळणार
अमरावती १९ तर बडनेरातून २४ जणांची अनामत जप्त बडनेरात महाविकासचे सुनिल खराटेंचे डिपॉझिट जप्त
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२५अमरावती
जिल्ह्यातील आठही मतदार संघाचे धक्कादायक निकाल लागले. महायुतीने मुसंडी मारत ७ जागांवर विजय मिळविला. तर महाविकासच्या वाट्याला केवळ दर्यापूरची एक जागा मिळाली. काँग्रेसचा जिल्ह्यात सुफडा साफ झाला. निवडणूक मैदानात १६० उमेदवार उतरले होते. यापैकी १७ उमेदवारांनी आपले डिपॉझिट वाचविले असून तब्बल १४३ उमेदवारांना आपली
अनामत रक्कम वाचविता आली नाही. प्रत्येक मतदारसंघातील वैध मताच्या सहावा हिस्सा अर्थात एक शष्टांस एवढी मते मिळवणारा उमेदवार अनामत रक्कम परत मागू शकतो.
सोमवार २५ नोव्हेंबर पासून हे उमेदवार संबंधित उपविभागीय कार्यालयात या रकमेची मागणी करू शकतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला दहा हजार रुपये दहा हजार तर राखीव जाती जाती जमातीतील उमेदवारांना ५ हजार रुपये अमानत रक्कम घ्यावी लागली होती. वैध मताच्या एक शष्टांस मते मिळवणारे केवळ १७ उमेदवार आहेत. तर उर्वरीत आठ विजयी आमदार व ९ पराभूत उमेदवारांचा समावेश आहे.
अमरावती मतदारसंघात अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी ३५८७६ मते पाहिजे होती. विजयी उमेदवार सुलभाताई खोडके यांच्याशिवाय काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख आणि आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांनी ही मर्यादा पार केल्याने त्यांचे डिपॉझिट परत मिळेल. तर माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता यांच्यासह उर्वरीत १९ उमेदवारांना डिपॉझिट परत मिळणार नाही.
बडनेरा मतदारसंघात अनामत रक्कम वाचण्यासाठी ३५३०२ मते पाहिजे होती. यापेक्षा अधिक मते विजय उमेदवार रवी राणा आणि पराभूत उमेदवार अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (उबाठा) चे सुनिल खराटे, अपक्ष तुषार भारतीय यांच्यासह २४ जणांना अनामत रक्कम परत मिळणार नाही.
अचलपूर मतदारसंघात डिपॉझिट परत मागविण्यासाठी ३५३९६ मते मिळविणे आवश्यक होती. यापेक्षा अधिक मते विजयी उमेदवार प्रवीण तायडे भाजप तर प्रहारचे बच्चू कडू आणि बबलू देशमुख यांना मिळवली आहेत. तिवसा मतदार संघात डिपॉझिट वाचण्यासाठी
३६६२१ मताची गरज होती. त्याहून अधिक मते विजय उमेदवार राजेश वानखडे आणि पराभूत यशोमतीत ठाकूर यांनाच मिळाली आहेत. मेळघाट विधानसभा मतदार संघात ३६६११ मते डिपॉझिट वाचविण्यासाठी आवश्यक होती.
मात्र हा कोटा विजयी उमेदवार केवलराम काळे व पराभूत काँग्रेसचे हेमंत चिमोटे हेच पूर्ण करू शकले. माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह १३ पराभूत उमेदवांचे डिपॉझिट जप्त झाले. मोर्शी मतदारसंघात डिपॉझिटचा कोटा ३४८८५ होता. यापेक्षा अधिक केवळ विजयी उमेदवार उमेश यावलकर यांनाच मिळाली. त्यामुळे माजी आ. देवेंद्र भूयार यांच्यासह १८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
दर्यापुरात ३४९९१ चा कोटा पूर्ण विजयी उमेदवार गजानन लवटे आणि पराभूत उमेदवार रमेश बुंदिले करु शकले. त्यामुळे माजी आ. अभिजित अडसुळयांच्यासह १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
धामणगाव रेल्वेत डिपॉझिट वाचण्यासाठी ३७ हजार ९६ हजार मते पाहिजे होती. यापेक्षा अधिक मतांचा कोटा प्रताप अडसड आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार माजी आ. वीरेंद्र जगताप यांनीच पूर्ण केला. त्यामुळे उर्वरीत २२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !