७४७२ मतदारांनी १६० उमेदवारांना नाकारले
एकालाही पसंती नाही, नोटाला मतदान
मेळघाटात सर्वाधिक २,४६२ मतदारांची नोटाला पसंती
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२५ अमरावती
अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघाचा शनिवारी निकाल घोषित झाला. यामध्ये तब्बल ७ हजार ४७२ मतदारांना मात्र १६० पैकी एकही उमेदवार पसंत पडला नाही. त्यामुळे या मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. मेळघाटात मतदार संघात सर्वाधिक २,४६२ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. आठ विधानसभा मतदार संघात १६० उमेदवार रींगणात होते. २५ लाख ४६ हजार ४५८ मतदारांपैकी १६ लाख ९० हजार ८८० मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ६६.४० इतकी आहे. याची मतमोजणी शनिवारी विधानसभानिहाय झाली. या निवडणुकीत दिग्गजांना धक्का बसला. तर नवख्यांना संधी मिळाल्याचे दिसून आले. परंतु यामध्ये ७ हजार ४७२ मतदारांनी नोटाला मतदान केल्याचे दिसुन आले आहे. १६० पैकी एकही उमेदवार या मतदारांना आवडला नाही. मेळघाट विधानसभा मतदार संघामध्ये अशा २ हजार ४६२ मतदारांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ दर्यापुर मतदार संघात १ हजार ३ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. जिल्ह्यात १६ लाख ९० हजार ८८० मतदान झाले आहे. यामध्ये काही मते ही अवैध देखील ठरली आहे. आठ मतदार संघाचा विचार केल्यास १४५५ मते अवैध ठरली आहे. यामध्ये सर्वाधिक ४६४ मते मोर्शी मतदार संघात अवैध ठरली आहे.
विधानसभानिहाय नोटा मते
■ अचलपूर २९८
■ तिवसा, ६३५
■मेळघाट २४६२
■ धामणगाव रेल्वे ७६८
■ दर्यापुर १००३
■ बडनेरा ६९२
■ अमरावती ८५६
■मोर्शी ७५८
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !