सारेच झाले रिलॅक्स: महिनाभरापासून होती कामाची दगदग
निवडणूक संपली; अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताण मिटला !
दि.२५अमरावती
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामातच व्यस्त होते. निवडणुकीची प्रक्रिया कधी पार पडते व कधी मतदान आटोपते, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता अधिकारी व कर्मचारी तणावमुक्त होऊन रिलॅक्स झाले आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाकडून काही शासकीय नियम घालून दिले आहेत. या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकांना करणे बंधनकारक आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर असते. निवडणुकीत पारदर्शकता राहावी,यासाठी प्रशासनातील अधिकारी आपली जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने पार पाडत असतात. कोणतेही गडबड, गोंधळ होऊ नये, याचा प्रत्येक अधिकाऱ्यांवर तणाव असतो.
प्रचाराच्या कालावधीत निघणाऱ्या रॅली, प्रचार सभा, स्टार प्रचारकांचा बंदोबस्त, मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी असलेला बंदोबस्त यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त भार सहन करावा लागला. २३ नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया आटोपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून अधिकारी व पोलिस कर्मचारी यांची सुटका झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रविवारी सुट्टीचा आनंद उपभोगला
मतमोजणी शनिवारला आटोपली. त्यानंतर रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने अधिकाऱ्यांना सुट्टीचा आनंद उपभोगता आला. अनेकांनी सहकुटुंब निसर्गाच्या सहवासात जाण्याला पसंती दिली, तर काहींनी मित्रमंडळी व नातेवाइकांच्या भेटीगाठीला प्राधान्य दिले. निवडणुकीच्या चर्चाचा आनंद उपभोगला.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !