…त्यांची तेवढी लायकी नाही, बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला सुनावले, चॅलेंजही दिले!
२ डिसेंबर ला भव्य कार्यकर्ता मेळावा
अमरावती
अपक्ष आमदार असूनही राज्याच्या विधानसभेत ज्यांचा कायम दरारा असायचा त्या बच्चू कडू यांनाही धक्कादायरित्या पराभवाला सामोरे जावे लागले. बच्चू कडू यांनी चार वेळा अपक्ष म्हणून विधानसभेत पाऊल ठेवले होते. यंदा पाचव्यांदा आमदार होण्यास ते उत्सुक होते. परंतु भाजप उमेदवाराने त्यांना अस्मान दाखवले.
महाराष्ट्रात महायुतीच्या लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचे पराभव झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, राजेश टोपे आदी नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. या नेत्यांबरोबच बच्चू कडू यांचाही पराभव झाला. पराभवानंतर राणा दाम्पत्याने पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. यावर बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे.राणा दाम्पत्याने माझ्या पराभवाचे श्रेय घेऊ नये, तेवढी त्यांची लायकी नाही, बच्चू कडू यांनी सुनावले
माझ्या पराभवाचे श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये. यंदा पूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते आणि तशा परिस्थितीत जर माझा पराभव झाला असता आणि मग राणा दाम्पत्याने श्रेय घेतले असते, तर समजू शकलो असतो. पण माझा पराभव करण्याची राणा दाम्पत्याची औकात नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर प्रहार केला.
आम्हाला पराभूत करण्याची जर एवढीच खुमखुमी असेल तर कोणताही मतदारसंघ निवडा
आम्हाला पराभूत करण्याची जर एवढीच खुमखुमी असेल तर कोणताही मतदारसंघ निवडा, तुम्ही बिगर पक्षाचा आणि मी देखील बिगर पक्षाचा, बघू कोण कुणाला पराभूत करंतय, असे आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिले.
धर्मयुद्ध आणि फतव्याच्या राजकारणात आमच्या सेवेचा झेंडा हरला, बच्चू कडू यांची खंत
धर्मयुद्ध आणि फतव्याच्या राजकारणात आमच्या सेवेचा झेंडा हरला. मी असे म्हणेन की राजकारण जिंकले आणि सेवा हरली. मला याच अचलपूरमधल्या जनतेने चार वेळा निवडून दिले, मी त्यांना दोष देणार नाही. मीच कुठेतरी कमी पडलो असेल, असेही बच्चू कडू म्हणाले.
https://epaper.vidarbhaprajasattak.com