शहराच्या अकोली परिसरात
मुंडके छाटलेला मृतदेह आढळला
शीर शोधून ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
अमरावती
स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आकोली गाव ते म्हाडा कॉलनी दरम्यान स्मशानभूमी जवळ एका अज्ञात व्यक्तीचा शीर गायब असलेला मृतदेह आढळल्याने परिसरात जबरदस्त खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या चमुसह ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.
पोलीस उपायुक्त गणेश इंगळे, उपायुक्त कल्पना बारवकर, क्राइम इन्व्हेस्टीगेशन युनिट, गुन्हे शाखा आदी पोलीस पथकांनी घटनेचा मागोवा घेतला. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी सत्तुर आणि चष्मा आढळल्याने त्यावरून मृतदेहाची तसेच हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे.
मृतदेहाची पटविण्यासाठी ओळख पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या चमुला घटनास्थळी पाचारण केले. त्यांच्या सुचनेनुसार पोलीस मृत व आरोपीचा शोध घेत आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या निर्दयीपणे करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. मृतदेहाची पोलिसांनी पाहणी केली असता अत्यंत विभत्स अवस्थेत मृतदेह होता. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात पाठविला. मृत व्यक्ती ही आसपासच्या परिसरातील असू शकते. त्याच्या अंगावरील कपड्यासोबतच त्याची चेहरा पट्टी समोर आणण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे. संबंधित व्यक्ती कुठला रहिवासी आहे याचा पोलीस प्राधान्याने विचार करीत आहे. त्यानंतर त्या माध्यमातून हल्लेखोरांपर्यंत पोहचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मृत व्यक्तीचे कोणासोबत वैमनस्य होते, कोणासोबत त्याचा वाद झाला होता, त्या वादाचे कारण काय इत्यादी प्रश्नांची उत्तरे मृताची ओळख पटविल्यानंतर मिळणार आहे. पोलीस संबंधित परिसरातील टॉवरवर लोकेट झालेल्या मोबाईलच्या माध्यमातून सुध्दा मृताचा व हल्लेखोरांचा शोध घेऊ शकते त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मृताची लवकरच ओळख होईल असा विश्वास पोलीस यंत्रणा व्यक्त करीत आहे.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !