अपघातानंतर शिवशाहीचा स्पीडवर कंट्रोल !
प्रवाशांमध्ये भीती : परिवहन विभागाकडून उपाययोजना सुरू
अमरावती
सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरीजवळ झालेल्या शिवशाहीच्या अपघातानंतर शनिवारी (दि.३०) जिल्ह्यातील मार्गावरून शिवशाही बस हळूहळू धावत होत्या. अपघाताची धास्ती आणि लोकांचा जनाक्रोश पुन्हा होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या स्पीडवर कंट्रोल आणल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शिवशाहीची स्पीड कमी झाल्याची चर्चा जिल्हाभरात होती.
शुक्रवारी शिवशाही बसचा झालेला अपघात हा अतिवेग आणि चालकाच्या चुकीमुळेच झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. तर याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा दुजोरा दिला. चालकाने वेग वाढवून अचानक ब्रेक
मारल्याने बस अनियंत्रित झाली आणि चालकाचे नियंत्रण बिघडल्याने बस उलटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या अपघातात ११ प्रवाशांचा बळी गेला.
त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्येसुद्धा रोष व्याप्त आहे. त्यामुळे शनिवारी (दि.३०) अमरावती जिल्ह्यातील मार्गावरून शिवशाही बसेस धावताना वेग कमी ठेवण्याच्या सूचना चालकांना विभागाने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवशाही बसेस फार हळू धावत असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात अनेकांनी पाहिले. शिवशाहीचा वेग अचानक कसा कमी झाला याचीच जिल्ह्यात दिवसभर चर्चा होती.
शिवशाही बसेसच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह
■ एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८९२ शिवशाही बसेस आहेत. कोराना काळात प्रवासी सेवा बंद असल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईस आली होती. परिणामी शिवशाही बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. या बसेसच्या सुट्या सामानांचा पुरवठा होत नसल्याने काही शिवशाहीची स्थिती अत्यंत बिकट आहेत. शिवाय तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या बसेसची दुरुस्ती वेळीच होत नसल्याने अपघात वाढत असल्याची माहिती आहे.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !