अजगराने केली रोईच्या पिल्लू ची शिकार, सर्पमित्राने केले रेस्क्यू
नेरपिंगलाई निलेश पांडे [ वार्ताहर ]
अमरावती रोडवरील नेर पिंगळाई येथील शेतात भल्या मोठ्या अजगराने रोईच्या पिल्लूची शिकार केली. स्थानकीय शेतकरी यांना त्यांच्या झोपडी मध्ये अजगर जातीचा साप दिसल्या बरोबर त्यांनी मोर्शी येथील सर्पमित्रांना माहिती दिली.व सर्पमित्रांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून शिरखेड वन विभागाचे अधिकारी एफ.जी खेरकर यांच्या ताब्यात दिले.
माहिती नुसार नेर पिंगळाई येथील शेतात रोईच्या पिल्ल्याची शिकार करून शेतातील झोपडी मध्ये हा अजगर आढळून आला . स्थानकीय शेतकरी यांनी अजगर जातीचा साप दिसल्यास त्यांनी ताबडतोब सर्पमित्रांना बोलावले. सर्पमित्र प्रियांशु तायवाडे, रोहित अमझरे, विवेक सावरकर, राज कुरवाडे, सुरज धुर्वे, राहुल पंडागरे, यांनी त्वरित शेतात जाऊन अजगराला पकडले.सर्पमित्रांच्या कार्याबद्दल शेतकरी व स्थानिक लोकांनी त्यांचे अभिनंदन केले.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !