शपथविधीची जय्यत तयारी
@विदर्भ प्रजासत्ताक
विधानसभा निवडणूक निकालाच्या १३ दिवसांनंतर आज अखेर नव्या सरकारचा शपथविधी पार पडत आहे आझाद मैदानावर महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिस दलातील पाच अपर आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त, २९ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ५२० पोलिस अधिकारी आणि ३५०० पोलिस अंमलदार तैनात असणार आहेत, तर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी एक अपर पोलिस आयुक्त, ३ पोलिस उपायुक्त, ३० पोलिस अधिकारी व २५० पोलिस अंमलदार सज्ज राहणार आहेत. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी, जलद प्रतिसाद दल, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथकाचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.