तुषार भारतीय मित्र परिवार व अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने हाफ मॅरेथॉन अटल स्पर्धेचे आयोजन
9 डिसेंबरला अटल दौड कार्यालयाचे उद्घाटन
21 किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या पुरुष व महिलांना टू व्हीलर मोटर गाडी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.८ अमरावती
तुषार भारतीय मित्र परिवार यांच्या वतीने गुरुकुल गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ऍथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे बुधवार 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5:45 वा. दसरा मैदान, बडनेरा रोड, अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल रोड स्पर्धेच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. 9 डिसेंबर 2024 रोजी सायं 6 वा गुलशन प्लाझा जवळ, मंत्री मोटर्स समोर, राजापेठ चौक रोड, अमरावती येथे क्रीडा, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
समाजाच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था सातत्याने प्रयत्वशील राहिली आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तरच विचार सकारात्मक राहतात आणि समाज म्हणून आपला खऱ्या अर्थाने विकास होती, अशी भूमिका राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल स्पर्धा आयोजनाच्या मागील असल्याचे मत मुख्य आयोजक भाजपा नेते तुषार भारतीय यांनी केली आहे.
राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा दसरा मैदान येथून प्रारंभ होऊन राजापेठ, कल्याण ‘नगर, मोती नगर, राजेंद्र कॉलनी, काँग्रेस नगर, हॅलो कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचवटी चौक, शेगाव नाका, विलास नगर, जुना कॉटन मार्केट, जयस्तंभ, जवाहर गेट, गांधी चौक, गौरक्षण चौक, भूतेश्वर चौक रवीनगर मार्गे समारोप दसरा मैदान होणार आहे.
असा राहणार वयोगट
(1) 14 वर्षाआतील मुले 3 KM मुली 3 KM
(2) 16 वर्षाआतील मुले 5 KM मुली 3 KM
(3) 20 वर्षाआतील मुले 8 KM मुली 5 KM
(4) 40 वर्षावरील। – पुरुष 5 KM महिला 5 KM
(5) खुला बर्ग महिला/पुरुष
(रन फॉर अमरावती) 3-км.
खुला वयोगट
(1) पुरुष व महिला – 10 KM
(2) पुरुष व महिला – 21 KM
या स्पर्धा मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धमध्ये प्रथम येणाऱ्या 21 किमी पुरुष टू व्हीलर मोटर गाडी तसेच 21 किमी महिला साठी टू व्हीलर मोपेड गाडी सोबत इतर गटांसाठी 4 लाख रोख रक्कम, सर्टिफिकेट व मेडल्स बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी www.ataldaud.com या लिंक वर जाऊन ऑनलाइन नाव नोंदणी 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत करावी तसेच अधिक माहितीसाठी 9372790281,8421478949,9421819514 9960088993, 7276819739, 8484949938, 9888111918,9923427216, 8087548500 9421946934,9881315958, 9552577778, 9834540638, 7709800058 संपर्क साधावा सोबतच मुख्य कार्यालय उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपा नेते तुषार भारतीय व अमरावती जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे सचिव अतुल पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.