स्व.वृषभ गावंडे व स्व. सोपान कोरडे स्मृतिप्रित्यर्थ उद्याला भव्य रक्तदान शिबिर
आनंद सभागृह येथे प्रहारचे आयोजन
बच्चू कडू यांची उपस्थिती
चांदुर बाजार
प्रहारचे कट्टर कार्यकर्ते स्व. ऋषभ गावंडे व स्व. सोपान कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमवारी आनंद सभागृह चांदुर बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गत काही दिवसांपूर्वी या दोन्ही प्रहार कार्यकर्त्यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी १० वाजता माजी आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष हा सेवेच्या माध्यमातुन मोठा झाला असून जिल्ह्यातील अनेक रुग्णसेवक व प्रहार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रहारला नेहमीच बळ मिळाले आहे.स्व. ऋषभ गावंडे व स्व. सोपान कोरडे हे दोन्ही कार्यकर्ते प्रहारचा आधारस्तंभ होते. चांदुर बाजार, अचलपूर तालुक्यात या दोन्ही कार्यकर्त्यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून निरंतर जनसेवा व रुग्णसेवा केली. विधानसभा मतमोजणीच्या दिवशी काळाने घाला घालून प्रहारच्या या दोन्ही कार्यकर्त्यांना हिरावून घेतले.
प्रहार पक्षासाठी ही मोठी हानी असून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने सोमवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात प्रहार कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.शिबिराच्या अधिक माहितीसाठी निखिल ठाकरे 9673925259 तसेच ऋषीकेश पोहोकार 8390250509 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.