शतकापूर्वीच संत गुलाबराब महाराजांनी ओळखले स्त्री महत्व- हभप-नयना बच्चू कडू
स्त्री महत्व पटविण्यासाठी अवलंबले स्त्री रूप
गुलाब गौरव कथेचे पाचवे पुष्प
चांदुर बाजार
शरीराने पुरुष व मनाने स्त्रीत्वाचा पूर्ण भाव आपल्या अंतकरणांमध्ये धारण करणारे व या जगतामध्ये स्त्री जीवनाच्या संपूर्ण उत्कर्षाकर्ता श्री गुलाबराव महाराजांचे शंभराव्या वर्षाच्या पूर्वीच अभूतपूर्व योगदान आहे.जेव्हा स्त्रीला चूल आणि मूल एवढाच दर्जा दिला जायचा तेव्हा गुलाबराब महाराजांनी स्त्री महत्व ओळखून स्त्री ही या जगाची जननी असून तीच तीचा सन्मान करण्याबाबतचे मत तेव्हा व्यक्त केले होते.माधान येथे सुरू असलेल्या गीता जयंती महोत्सवात गुलाब गौरव कथेच्या माध्यमातून हभप नयना बच्चू कडू यांनी आज पाचवे पुष्प गुंफले.
५ ते १२ डिसेंबर दरम्यान भक्तीधाम येथे सुरू असलेल्या गीता जयंती महोत्सवाच्या दरम्यान हभप नयना कडू यांनी संत गुलाबराव महाराज यांच्या अनेक सामाजिक पैलूंना भाविकांसमोर मांडले. श्री गुलाबराव महाराजांचे स्त्री विषयक विचार सांगत असताना स्त्रियांच्या जीवनामध्ये असणारा समतोल हा किती महत्त्वाचा आहे याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण हभप नयना कडू यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये केलेला आहे. कथा श्रवणाच्या भागांनी श्री गुलाबराव महाराजांच्या छोट्या छोट्या चरित्रात्मक कथांचा भावपूर्ण प्रवाह आपल्या उगवत्या वाणीमध्ये वर्णन करत असताना श्री गुलाबराव महाराजांचा प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी असणाऱ्या श्रोते वृंदांच्या चक्षुपटलावरती येत आहे.
तरुण मंडळींनी परमार्थ करताना कोणकोणते निर्णय विवेक बुद्धीने घ्यावे याचाही विचार सुद्धा नयना कडू यांनी व्यक्त केले. श्री गुलाबराव महाराजांचा स्वमत निर्णय सारखा ग्रंथ ज्यामध्ये सूत्रात्मक पद्धतीने अनेक विषयांचे प्रतिपादन श्री गुलाबराव महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये केलेला आहे. साधू बोध,भागवत, भक्ती, सौरभ, समीक्षा पत्र अशा अनेक ग्रंथांद्वारे श्री गुलाबराव महाराजांच्या सर्व विद्या वैभवाचे दर्शन हभप नयना कडू या आपल्या कथा भावामध्ये प्रगट करत आहे. भारतीय संस्कृती अचाट आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी आहे याचा पुरस्कार सकलसंतांनी आपल्या साहित्य तपाच्या द्वारे या भू मंडळामध्ये प्रगट केलेला आहे. भारत हा देश पुरोगामी विचारांचा नाही तर तो प्रतीक्षणा वर्धमान या न्यायाने प्रत्येक वेळेस नावीन्यपूर्ण अशा चेतनेचा अविष्कार आहे.यामध्ये स्त्रीच जीवन हे सर्वोत्तम आहे. म्हणून भारतीय संस्कृतीने स्त्रियांचा कधी अवमान केला नाही उलटपक्षी स्त्री सर्वतो परिबंधनीय आहे याचा पुरस्कार अनादी काळापासून गार्गी, मैत्री, सीता, द्रोपदी यासारख्या चरित्रांद्वारे ते प्रगट झालेले आहेत.
मध्यवर्गीय काळ जो स्त्री विषयांच्या संदर्भामध्ये नाना प्रकारचे शंका कुशंका प्रगट करते अशा शंकांच्याद्वारे स्त्री जीवनाच्या संदर्भातले संभ्रम या समाज मनातल्या अनेक लोकांच्या अंतकरणांमध्ये विंबवल्या गेले. प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांनी या सर्व विषयांना पूर्णविराम देण्याकरिता स्वयम स्त्रीवेश धारण करून भक्ती तत्वातलं आणि प्रेम तत्वातलं निष्कलंक असे चरित्र स्त्रियांचच असू शकतं आणि ते समर्पित जीवन या जगतामध्ये भारतासारख्या देशाशिवाय अन्यत्र त्या ठिकाणी दिसत नाही. पतिव्रता धर्म आचरण धर्म आणि समर्पण धर्म या तीन गोष्टींमुळे अनेक पिढ्यांचे संस्करण करण्याचं दायित्व स्त्रियांमध्ये आहे.आणि हे त्यांचे सामर्थ्य कुशलतेने त्यांच्या स्वभावामध्ये नैसर्गिकरित्या आलेला आहे. वृद्ध मंडळी व आपल्या जीवनाच्या सर्व वहिवाटी पूर्ण करत अनुभवाच्या एका मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातला उत्तम मार्गदर्शन प्रवचनाच्या द्वारे नयना कडू यांनी स्वतः त्या ठिकाणी दिले.
या प्रवचन व व्याख्यानासाठी स्त्रीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते तसेच पुरुषवर्ग सुद्धा अत्यंत एकाग्रतेने या कथेचा श्रवण करत आहे.श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्र कथेचा हा प्रवाह प्रथमताच भक्तीधामच्या व्यासपीठावरती हभप नयना कडू यांच्या मुखाद्वारे प्रवाहित होत आहे. अनेकांनी श्री गुलाबराव महाराजांच्या सुक्ष्मातील सूक्ष्म चरित्रांचे वर्म मर्म जाणून घेण्याकरता आपल्या दैनंदिन जीवनातला वेळ काढून त्या ठिकाणी श्री महाराजांच्या कथा भावाला आपल्या अंतकरणात धारण केलेलं आहे.