धारणीतील शिक्षकाचा शिक्षिकेवर जबरीने बलात्कार
शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती,
धारणी तालुक्यात कार्यरत असलेल्या विवाहित शिक्षकाने पत्नीशी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगून एका अविवाहित शिक्षिकेला लग्नाचे आमिष देऊन तिला शेगावात नेले आणि तेथे तिच्यावर जबरीने बलात्कार केला. याबाबत शेगाव शहर पोलिस ठाण्यात शिक्षकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
अंकित हुकुमचंद मालवीय, रा. जयस्तंभ चौक, धारणी, जि. अमरावती असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार अंकीत मालवीय हा धारणी तालुक्यातील एका शाळेवर शिक्षक असून तो विवाहित आहे. पिडीत शिक्षिका देखील धारणी तालुक्यात शिक्षिका म्हणून कार्यरत असून तिची अंकित सोबत ओळख होती. अंकीतने पत्नीपासून लवकरच घटस्फोट होणार असल्याची खोटी स्टोरी सांगून शिक्षिकेला जुलै २०२४ मध्ये विवाहाचे आमिष देऊन दिले. पिडीतेला अंकीत हा आवडत असल्याने ती सुध्दा लग्रास तयार होती. याचाच फायदा घेत अंकीतने शिक्षिके सोबत अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. परंतु, पिडीतेने विवाहापूर्वी अशा संबधांना नकार दिला. त्यामुळे अंकीत हा ७ डिसेंबर रोजी पिडीतेला घेऊन शेगावला गेला आणि दोघेही एका रूममध्ये थांबले. रूममध्ये अंकीतने पुन्हा शिक्षिकेशी शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिक्षिकेने नकार देतात यावेळी अंकीतने शिक्षिकेसोबत जबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने रात्रभर पिडीतेचे लैगींक शोषण केले. अंकीतपासून सुटका होताच पिडीतेने शेगाव शहर पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली त्यानंतर पोलिसांनी तक्रार दिली.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !