
मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याबाबत कोणतीही तक्रार व मदत लागल्यास
महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
अमरावती
मालमत्ता कर भरण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांच्या मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याकरिता महानगरपालिकेची वेबसाईट www.amravaticorporation.in तथा www.amravatimc.in व amravatimc.org या संकेतस्थळावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता कर धारकांना मालमत्ता कर भरणा करण्याबाबत कोणतीही तक्रार व मदत लागल्यास कृपया (1800-268-2901), (1800-833-2700) या टोल फ्री क्रमांकावर Monday to Friday 10 am to 6 pm except Government holidays संपर्क साधावा अथवा [email protected] या इमेल आय.डी. वर मेल करावे असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.