रवी राणा यांची मोठ्या पदावर वर्णी लागणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत
मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून एक ते सव्वा तास चर्चा
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२७
अमरावती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी आमदार रवी राणा यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यांनी रवी राणा यांना मोठ्या पदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. एक ते सव्वा तास अमरावती जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प व ज्वलंत प्रश्नावर संमिश्र चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्ण ताकदीने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, जिल्ह्यातील विकासाचे विषय आदिवासी, महिला, शेतकरी, शेतमजुर, वंचित घटकांच्या युवक-युवती, दिव्यांग तसेच विविध घटकातील लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पुर्णपणे आमदार रवी राणा यांच्या सोबत असणार आहे.
जिल्ह्यांतील अतिशय महत्वाचे ग्रामीण आणि शहरातील प्रकल्प ,विकास कामाचे प्रस्ताव शासनाच्या कडे प्रस्तावित आहे. यावर आ.रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली.विशेषतः बेलोरा एअरपोर्ट, पीम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क, अमरावती-परतवाडा-धारणी ते खंडवा राज्यमार्गला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा देण्यात यावा, मोर्शी येथील हिवरखेड संत्रा प्रक्रिया केंद्र आणि चिखलदरा येथील स्कायवॉक समवेत इतर प्रलंबित विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. यावर विदर्भ सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. लवकरच अमरावती (बेलारा) विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सुरू होणार आहे. जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला देखील पंख लागणार आहे. लवकरच हे अतिमहत्वाचे प्रकल्प, प्रस्ताव आजच्या या बैठकीच्या माध्यमातून पुर्णत्वास जातील. तसेच जिल्हाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे निर्णय घेणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. सोबतच आमदार रवी राणा यांना मोठी जबाबदारी मिळणार आणि जिल्ह्याला लवकरच गोड बातमी मिळणार.हे मात्र नक्की..
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !