बीड आणि परभणी येथील घटनांमध्ये रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी – बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया,
अमरावतीत ठिय्या आंदोलनाला बच्चू कडू यांचा सहभाग.
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२८ अमरावती
बीड आणि परभणी येथील घटनांमध्ये रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी स्पष्टपणे दिसून येते अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर केली,सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे.. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे ही म्हण अधोरेखित करायची नसेल तर अतिशय स्वच्छपणे कारवाई झाली पाहिजे आणि करायची असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे की होय हे आमचे गुंडे आहे व झालेल्या घटनेवर पारदर्शकपणे कारवाई होणे आवश्यक आहे… सत्य महत्त्वाचे असते सत्ता महत्त्वाची नसते… हे लोकांना सांगणे गरजेचे आहे… नाहीतर याचे मोठे परिणाम उद्या सरकारला भोगावे लागतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला, मस्साजोग येथील माजी सरपंच स्व. संतोष देशमुख आणि परभणी मधील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले,या आंदोलनात माजी मंत्री व प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थिती लावली, दरम्यान बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत सरकारला आव्हान दिलं,